Thursday, May 2, 2024
घरमानिनीHealthBaby Plan करण्याआधी आहारात करा '4' न्यूट्रीयंट्सचा समावेश

Baby Plan करण्याआधी आहारात करा ‘4’ न्यूट्रीयंट्सचा समावेश

Subscribe

बदलती लाइफस्टाइल आणि अनियमित आहार यामुळे हल्ली बऱ्याच महिलांना वंध्यत्व अर्थात इन्फर्टिलिटीचा धोका जाणवू लागला आहे. दिवसेंदिवस या समस्येत वाढ होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत योग्य रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ साठी सकस आहार घेणं गरजेचे आहे. आज आपण अशीच काही न्यूट्रिएंट्स पाहणार आहोत ज्याने ही समस्या दूर होण्यास मदत मिळते.
तज्ञांच्या मते, महिलांच्या जीवनात पोषणाला विशेष महत्व आहे. पौष्टिक आहार केल्याने केवळ शरीर निरोगी राहत नाही तर इन्फर्टिलिटी देखील सुधारते. आहारात पोषक तत्वाचा समावेश केल्यास ओव्हुलेशन होण्यास मदत मिळते. हे हार्मोन्स संतुलित राहण्यासाठीही मदत करतात. शिवाय योग्य आहार न घेतल्यास होणाऱ्या बाळाच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होतो.

Free Photo | Front view happy family expecting baby

- Advertisement -

या न्यूट्रिएंट्सनी इन्फर्टिलिटीची समस्या दूर होण्यास मिळेल मदत –

लोह –
प्रेग्नन्सीपासून ते स्तनपानापर्यंत महिलेला भरपूर प्रमाणात लोह आवश्यक असते. याचे सेवन केल्याने ब्लड सर्कुलेशन देखील सुधारते. सोबतच लाल रक्त पेशींचे प्रमाणही वाढते. ज्यामुळे शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा होतो. लोहाचे नियमित सेवन केल्याने अ‍ॅनिमियाच्या समस्येपासून आराम मिळतो. प्रेगन्सीदरम्यान, महिलेला दररोज 18 मिलिग्रॅम ते 27 मिलिग्रॅम लोह आवश्यक असते. तुमच्या शरीरात जर लोहाची कमतरता असेल तर तुमच्या आहारात मांस, मासे आणि बीन्स चा अवश्य समावेश करा.

- Advertisement -

कॅल्शियम –
कॅल्शियमच्या सेवनाने शरीरात हार्मोन्स संतुलित होऊ लागतात आणि परिणामी, फर्टिलिटी क्षमता सुधारू लागते. CDC नुसार, 19 वर्षावरील सर्व महिलांनी दररोज 1000 मायक्रोग्रॅम कॅल्शियमचे सेवन करायला हवे. मग ती प्रेग्नेंट असो वा नसो. प्रेगन्सीदरम्यान, महिलांच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता जाणवण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा परिस्थितीत कॅल्शियमचे नियमित सेवन फायद्यचे ठरेल.

फॉलीक अ‍ॅसिड –
फॉलिक अ‍ॅसिड हे व्हिटॅमिन बी 9 आहे. जे डॉक्टर्स प्रेगन्सीदरम्यान स्त्रियांना घेण्याचा सल्ला देतात. याच्या सेवनाने शरीरातील लाल रक्तपेशी दुरुस्त होतात. तज्ज्ञांच्या मते, प्रेगन्सीमध्ये 400 मायक्रोग्रॅम फोलेटच्या सेवनाने बाळाला मेंदू आणि मणक्याचा आजाराचा उद्भवणारा धोका कमी होतो. औषधांव्यतिरिक्त हिरव्या पालेभाज्या, संत्री, केळी, मशरूम आणि ओट्सचे सेवन केल्याने शरीरातील फॉलिक अ‍ॅसिडची कमतरता पूर्ण होते.

ओमेगा 3 फॅटी ऍसिड –
फिश ऑईलमध्ये ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड मुबलक प्रमाणात असतात. त्याच्या मदतीने हार्मोन्सचे नियमन आणि ओव्हुलेशन वाढविण्यास मद्दत मिळते. शिवाय जास्त वजन असलेल्या स्त्रियांमध्येही प्रजनन क्षमता वाढते. शरीरातील ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडची पातळी वाढवण्यासाठी पालक, ब्रोकोली, अक्रोड, मासे आणि खरबूज आणि अक्रोड यांचा जेवणात समावेश करा.

 


हेही वाचा ; हेल्दी sex life साठी डाएट मध्ये घ्या ‘हे’ व्हिटॅमिन

 

- Advertisment -

Manini