Thursday, May 16, 2024
घरमानिनीHealthबदाम खा, वजन वाढवा

बदाम खा, वजन वाढवा

Subscribe

आजकाल जिथे लोक वाढत्या वजनाने हैराण आहेत, तिथे काहींचे वजन अजिबात वाढत नाही. शरीरयष्टी बारीक असल्याने चार लोकांमध्ये अनेक जणांचे हस होत आहे. अनेक जण वजन वाढविण्यासाठी विविध प्रकारच्या सप्लिमेंट्स घेत आहेत. पण, त्यामुळे फायद्याऐवजी नुकसान होऊ शकत. अशा स्थितीत तुम्ही बदाम खाऊ शकता. बदाम हे एक सुपरफूड आहे, जे खाल्याने शरीराला असंख्य फायदे होतात. जर तुम्हाला नॅचरल पद्धतीने वजन वाढवायचे असले तर तुम्ही तुमच्या आहारात बदामाचा समावेश करू शकता. बदामात कॅलरीज, निरोगी चरबी, व्हिटॅमिन इ, फायबर आणि प्रोटिन्स असतात.

वजन वाढीविण्यासाठी असे करा बदामाचे सेवन –

- Advertisement -

वजन वाढविण्यासाठी तुम्ही बदाम आणि दुधाचे सेवन करू शकता. यासाठी 4 ते 5 बदाम बारीक करून दुधात उकळवून घ्या. थोडे थंड झाल्यावर त्याचे सेवन करा. तुम्हला हवे असल्यास तुम्ही सामान्य तापमानावरील दुधातही बदाम बारीक करून न शिजवता पिऊ शकता.

- Advertisement -

याशिवाय तुम्ही भिजवलेले बदाम खाऊ शकता. 5 ते 6 बदाम रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी सेवन करा. यामुळे देखील पातळ शरीरयष्टी सुधारण्यास मदत होईल.

जर तुम्हाला दूध आवडत नसेल तर तुम्ही बदामाची खीर बनवून खाऊ शकता. बदामाची खीर देशी तुपात बनवली जाते. यामुळे वजन वाढीसाठी ते फायद्याचे ठरते.

वजन वाढीसाठी तुम्ही बदामाचे लाडूही खाऊ शकता. काजू आणि मनुका यासारखे इतर प्रकारचे पौष्टीक ड्रायफ्रूट्स लाडू तयार करण्यासाठी वापरले जातात. याशिवाय दूध, तूप आणि साखरेचा वापर केला जातो. या सर्व पदार्थांमध्ये भरपूर पोषक तत्वे असतात. जे वजन वाढीसाठी उपयोगी ठरतात.

निरोगी वजन वाढण्यासाठी इतर पौष्टिक बाबी –
वजन वाढण्याच्या प्रवासात बदाम लक्षणीयरीत्या मदत करतात. पण, त्यासोबतच संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करणेही फायद्याचे आहे.

उच्च कॅलरी असलेलं अन्नपदार्थ – बदामाच्या व्यतिरिक्त, तुमच्या जेवणात कॅलरी समृद्ध असलेले पदार्थ समाविष्ट करा, उदाहणार्थ – एवाकाडो, नट बटर, ऑलिव्ह ऑइल आणि संपूर्ण धान्य जसे की, ब्राऊन राईस. हे खाद्यपदार्थ तुम्हाला तुमच्या दैनंदिन कॅलरी वाढविण्यास मदत करतील.

प्रोटीनयुक्त अन्नपदार्थ – स्नायूंच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी प्रोटीन आवश्यक आहे. जे वजन वाढीसाठी मदत करते. बदामाच्या व्यतिरिक्त, तुम्ही आहारात दुगजन्य पदार्थ, मासे, अंडी आदींचा समावेश करा.

पुरेसे पाणी – आरोग्यसाठी पुरेसे पाणी पिणे महत्वाचे असते. हायड्रेटेड राहण्यासाठी आणि वजन वाढविण्याच्या तुमच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी दिवसभरात 2 लिटर पाणी समान रीतीने पिणे आवश्यक आहे.

तज्ज्ञांच्या सल्ला घ्या – वजन वाढणे हा एक अवघड प्रवास आहे. वजनवाढीस अडचणी निर्माण होत असतील तर नोंदणीकृत आहारतज्ञ किंवा पोषणतज्ञांचा सल्ला अवश्य घ्यायला हवा.

 

 

 


हेही वाचा :Banana For Health : दररोज केळी खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे

 

- Advertisment -

Manini