Tuesday, May 7, 2024
घरमानिनीHealthरात्रीच्या जेवणानंतर 'या' चुका केल्यास वाढेल वजन

रात्रीच्या जेवणानंतर ‘या’ चुका केल्यास वाढेल वजन

Subscribe

बिघडलेली लाइफस्टाइल आणि खाण्यापिण्याच्या कारणास्तव वजन वाढणे एक सामान्य समस्या आहे. या व्यतिरिक्त मधुमेह आणि ब्लड प्रेशर सारख्या कारणामुळे लठ्ठपणा वाढला जातो. काही वेळेस खाण्यापिण्याच्या नियमांचे पालन न केल्याने आणि खाण्याच्या काही चुकीच्या सवयीमुळे लोकांचे वजन वाढले जाते. एक्सपर्ट्सच्या मते, रात्रीच्या वेळी जेवल्यानंतर लगेच झोपू नये. कारण यामुळे सुद्धा लठ्ठपणा आणि पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो. अशातच जाणून घेऊयात रात्रीच्या जेवणानंतर नक्की कोणत्या चुका करणे टाळले पाहिजे.

-अधिक पाणी पिऊ नका

- Advertisement -

Before, during or after the meal: When to drink water? | The Times of India
शरीराला हाइड्रेट ठेवण्यासाठी पाणी पिणे अत्यावश्यक आहे. मात्र खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका. हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, शरीरात जेव्हा अन्न जाते तेव्हा ते पचनासाठी कमीत कमी दोन तासांची वेळ लागते. याच दरम्यान पाणी प्यायल्यास याचा पचनक्रियेवर ही परिणाम होतो. त्यामुळे जेवल्यानंतर कमीत कमी 45-60 मिनिटानंतर पाणी प्यावे.

-जेवल्यानंतर लगेच झोपणे

- Advertisement -

How long after you eat should you sleep? – Sleep Republic
खाल्ल्यानंतर लगेच झोपणे आरोग्यासाठी उत्तम नाही. याच कारणास्तव वजन वाढणे, अॅसिडिटी रिफ्लक्स आणि पचनासंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. या व्यतिरिक्त जळजळ, गॅस अॅसिडिटी,ब्लोटिंगची समस्या ही होते. खाल्ल्यानंतर ते झोपण्याच्या वेळेत कमीत कमी 3-4 तासांचा गॅप असावा. यासाठी प्रयत्न करा की, तुम्ही झोपण्याआधी तीन-चार तास आधी जेवावे.

-कॅफेनचे सेवन

14 Surprising Side Effects of Drinking Coffee Every Day — Eat This Not That
काही लोक चहा आणि कॉफीचे ऐवढे सेवन करतात की, त्याची त्यांना सवय होते. या व्यतिरिक्त जेवल्यानंतर लगेच कॉफी किंवा चहाचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकता. एक्सपर्ट्सच्या मते, जेवल्यानंतर लगेच कॅफेनचे सेवन केल्याने पचनक्रियेवर त्याचा परिणाम होतो. शरीरात जेवण पचत नाही. त्यामुळे गॅस-अॅसिडिटीची समस्या होऊ लागते. त्याचसोबत वजन ही वाढले जाते.

-रात्री उशिरा जेवणे

5 Quick And Healthy Recipes For Satiating Late-Night Dinner - NDTV Food
बहुतांश लोक रात्री उशिरा जेवण करतात. खरंतर दिवसभराची कामे आटोपण्यासाठी कधीकधी रात्र होते. अशातच उशिराने जेवल्याने आपण खाल्लेले अन्न व्यवस्थितीत पचले जात नाही. त्यामुळे तुम्ही रात्रीचे जेवण 7-8 दरम्यान केले पाहिजे. तर 10-11 दरम्यान झोपण्याचा प्रयत्न केला पाहिजे.


हेही वाचा- दीर्घायुष्य हवे मग फॉलो करा ‘हे’ नियम

- Advertisment -

Manini