Tuesday, May 14, 2024
घरमानिनीHealthपोटाची चरबी कमी करण्यासाठी असा करावा आहार

पोटाची चरबी कमी करण्यासाठी असा करावा आहार

Subscribe

आज कालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे पोटाची चरबी वाढते. यात तुम्ही व्यायाम न करणे, चुकीचा आहार घेणे आणि जेवणाच्या वेळा न पाळणे. यामुळे तुमच्या पोटाची चरबी वाढते आणि आरोग्याच्या अनेक समस्या उद्धभवतात. तुम्हाला पॅरालिसिस, डायबिटीस आणि हार्ट अटॅक यासारख्या आजाराचा धोका वाढण्याची शक्यता असते. यासाठी तुम्ही योग्य आहार घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

 असा करा आहार

पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही हिरव्या पालेभाज्या, फळे, मोड आलेली कडधान्य, सुकामेवा, मांस, मासे, अंड्याचा पांढरा भाग आणि लिंबूचे पाणी आदीचा समावेश करावा. या पदार्थात जास्त प्रमाणात खनिजे, व्हिटॅमिन्स आणि प्रोटिन्स असते. तसेच तुम्ही दिवसभरात 7-8 ग्लास पाणी प्यावे.

- Advertisement -

‘ही’ काळजी घ्यावी

  • एका वेळी पोट भरून जेवण करू नये. दिवसात 3-4 वेळा थोडे थोडे खावे. यामुळे जेवण पचन होते
  • जर तुम्हाला भूक लागली नसेल, तर काही खावू नये
  • दीर्घ काळ उपाशी देखील राहू नये. यामुळे चयापचय क्रिया बिघडून पोटाची चरबी वाढू शकते
  • जेवण केल्यानंतर एका तासाने ग्लासात कोमट पाणी प्यावे
  • शहाळ्याचे पाणी, ग्रीन टी आणि लिंबाचे पाणी प्यावे
  • सकाळी मध, लिंब आणि गरम पाणी एकत्र करून प्यावे
  • रात्री झोपण्यापूर्वी 2-3 तास अगोदर जेवण करणे गरजेचे असते.

‘हे’ खाणे टाळावे

  • मिठाई, मैद्याचे पदार्थ, जंकफूड, फास्टफूड, कोल्ड्रींग, बेकरी प्रोडक्ट, साखरेचे गोड पदार्थ, तुपाचे पदार्थ आणि अंड्यातील पिवळा बलक हे पदार्थ खाणे टाळावे
  • कोल्ड्रिंक्स, बंद बाटलीतील फळांचा रस पिणे टाळावे.
  • मद्यपान, बिअर, सिगारेट तंबाखूचे सेवन करणे टाळावे.
  • असा करा आहार
  • रात्री पाण्यात बदाम भिजत टाका आणि सकाळी उठल्यावर बदामाची साल काढून ते खावे.
  • ब्रेक फास्टमध्ये फळ किंवा मूठभर शेंगदाणे खावे
  • सकाळच्या वेळते 45 मिनिटे एक्ससाइज करावे, पार्कमध्ये चालावे, जॉगिंग, सायक चालवणे, पोहणे आणि पायऱ्या चढणे-उतरणेयासारख्या एक्ससाइज करू शकता.

  • तुम्ही दुपारच्या जेवणात चपात्या किंवा भाकरीसोबत वाटीभर उसळ, डाळ खावे. जर मांसाहार करत असाल, तर चिकन किंवा मासे खावे.
  • सायंकाळी पाच वाजता डाळींब, सफरचंद आणि संत्रे खावे किंवा मूठभर शेंगदाणे खावे.
  • रात्रीच्या जेवणात भाकरी किंवा चपात्यासोबत भाजी किंवा डाळ खावे.
  • झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यावे.

हेही वाचा – Cholesterol कंट्रोल करायचाय? मग लसूण खा

- Advertisment -

Manini