घरक्राइमMukhtarAnsari : कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

MukhtarAnsari : कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Subscribe

कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तरुंगात मुख्तार अन्सारी याला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान मुख्तार अन्सारीचा मृत्यू झाल्याचे समजते.

लखनऊ : कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तरुंगात मुख्तार अन्सारी याला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान मुख्तार अन्सारीचा मृत्यू झाल्याचे समजते. (Mukhtar Ansari Notorious gangster Mukhtar Ansari dies of heart attack)

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्तार अन्सार चक्कर आल्याने तुरुंगात बेशुद्ध अवस्थेत पडला होता. त्यानंतर तुरुंग प्रशासनाने त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. मंगळवार, 26 मार्च रोजी मुख्तार अन्सारी याला अचानक तब्येत बिघडल्यामुळे आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. मेडिकल कॉलेजमधील आयसीयूमध्ये भरती करण्यात आले.

- Advertisement -

मुख्तार अन्सारी उत्तर प्रदेशच्या बांदा तुरुंगात शिक्षा भोगत आहे. दरम्यान, अचानक तब्येतीत बिघाड झाल्याने मुख्तार अन्सारी याला सोमवारी रात्री जिल्हा हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. तिथे डॉक्टरांनी ऑपरेशन करण्यास सांगितल्याने ताबडतोब त्याला मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले.

मुख्तारच्या तब्येतीवर जिल्हा प्रशासन, पोलीस, तुरुंग प्रशासन काहीच बोलण्यास तयार नाही. दोन दिवसांपूर्वीच मुख्तारच्या सुरक्षेवरून जेलर आणि दोन डेप्युटी जेलर यांना निलंबित करण्यात आले होते. शिवाय, मुख्तार काही दिवसांपासून युरिनल इन्फेकशनमुळे त्रस्त होता.

- Advertisement -

मुख्तारने काही दिवसांपूर्वी स्लो पॉयझन दिले जात असल्याचा आरोप केला होता. 21 मार्चला कोर्टात त्याने वकिलांमार्फत हा आरोप केला होता. १९ मार्चला रात्री त्याला विषारी पदार्थ देण्यात आल्याचा आरोप त्याने केला होता. यामुळे त्याची तब्येत बिघडल्याचे त्याने म्हटले होते. यानंतर कोर्टाच्या आदेसानुसार दोन डॉक्टरांची टीम तुरुंगात गेली होती. तपासणीनंतर त्याचे रक्ताचे नमुनेही घेण्यात आले होते. या रिपोर्टनंतर त्याला काही औषधे देण्यात आली होती. मात्र, रोजा ठेवल्याने असे होत असल्याचे डॉक्टरांनी तुरुंग प्रशासनाला सांगितले होते.


हेही वाचा – Suicide : कोटामधून पुन्हा वाईट बातमी; NEET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -