Sunday, April 28, 2024
घरमानिनीHealthऊन्हाळ्यात पोटात वाढते उष्णता

ऊन्हाळ्यात पोटात वाढते उष्णता

Subscribe

उन्हाळ्यात शरीरात पित्तदोष वाढून आरोग्याशी संबंधित अनेक समस्या आपल्याला जाणवतात. पित्तदोष वाढला की, पोटाच्या समस्याना आमंत्रण मिळते शिवाय उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता आणि डिहायड्रेशनची समस्या निर्माण होते. उन्हाळ्यात पाणी कमी प्यायलास, आहारात पाण्याचं प्रमाण कमी राहिल्यास शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते आणि त्यामुळे शरीरात आणि पोटात उष्णता वाढते. यासाठी तज्ञ कायम, भरपूर पाणी पिणे, नारळ पाणी, फळे खाण , सकस आहार करण्याचा सल्ला देतात.

पोटातली उष्णतेचे परिणाम –

- Advertisement -

हाडांमध्ये वेदना जाणवते – पोटात उष्णता आल्यावर हाडांमध्ये वेदना आणि कडकपणा येतो. कारण हाडांमधील ओलावा टिकून राहावा यासाठी हाडांमध्ये पाणी असणे अत्यंत गरजेचे असते. पोटात उष्णता असल्यावर पाणी कमी होऊ लागते.

तोंडातील अल्सर – वारंवार तोंड येत असेल तर पोटाच्या उष्णतेची लक्षणे असू शकतात. चुकूनही त्याकडे दुर्लक्ष करू नये. अनेकदा पोटात उष्णता वाढल्यामुळे किंवा पित्तामुळे फोड येऊ लागतात.

- Advertisement -

तळपायात जळजळ वाटणे – शरीरात पाण्याची कमतरता असल्याने पाय आणि तळपायाच्या जळजळीची समस्या जाणवते. जेव्हा आपण झोपतो तेव्हा जळजळ वाढू लागते. पायांची जळजळ होत असेल आणि तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत असाल तर ही समस्या तुमच्यासाठी मोठी समस्या ठरू शकते. यासाठी तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष द्या.

पोटातील उष्णतेवर उपाय –

  • भरपूर पाणी प्या. काकडी खा.
  • टरबुजही तुम्ही खाऊ शकता. टरबूज हे असे फळ आहे ज्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते.
  • दही किंवा ताक प्या.
  • चहा किंवा कॉफी पिणे टाळा.
  • हिरव्या भाज्या जास्त प्रमाणात खा. हिरव्या भाज्यां शरीराला दीर्घकाळ हायड्रेट ठेवतात.

  • शक्यतो घरातीलच अन्नपदार्थ खा.
  • ओव्याच्या पानांचा आहारात समावेश करा. या पानांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते.
  • शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उन्हळ्यात वेळेवरच जेवण करा.
  • आहारात उष्णता वाढवणारे पदार्थ खाणे टाळा, आंबट फळ, आंबट पदार्थ, लसूण, आले, तिखट पदार्थ खाणे टाळा.

 

 

 


हेही वाचा : उन्हाळ्यात कोल्ड्रिंक्स पिण्याचे दुष्परिणाम

 

- Advertisment -

Manini