घरक्रीडाIPL New Rules : आयपीएलच्या 17 व्या पर्वात असणार दोन नवे नियम;...

IPL New Rules : आयपीएलच्या 17 व्या पर्वात असणार दोन नवे नियम; सिस्टममध्येही होणार बदल

Subscribe

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 17 व्या पर्वाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. दरवर्षी आयपीएलचे सामने होण्यापूर्वी अनेक बदल झालेले पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे यंदाच्या आयपीएलमध्ये दोन नवे बदल पाहायला मिळणार आहेत.

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 17 व्या पर्वाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. दरवर्षी आयपीएलचे सामने होण्यापूर्वी अनेक बदल झालेले पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे यंदाच्या आयपीएलमध्ये दोन नवे बदल पाहायला मिळणार आहेत. या नियमांमुळे पंच आणि गोलंदाजांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच रोमांचक सामनेही चाहत्यांना पाहता येणार आहेत.

IPL 2024 मध्ये गोलंदाजांसाठी बाउंसर आणि पंचांसाठी स्मार्ट रिव्ह्यू सिस्टमचे नियम लागू केले जाणार आहेत. या नियमांनुसार गोलंदाजांना आता एका षटकात दोन बाउंसर चेंडू टाकता येणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या टी-20 सामन्यात एक गोलंदाज एका षटकांत फक्त एक बाउन्सर टाकू शकतो. आयपीएलमध्येही असाच नियम लागू होता. मात्र आयपीएलच्या 17 व्या पर्वात बदल करण्यात आला आहे. याआधी हा नियम भारताच्या टी-20 देशांतर्गत स्पर्धा, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये वापरला गेला असून त्याचा गोलंदाजांना फायदा होणार आहे.

- Advertisement -

याशिवाय, यंदाच्या आयपीएलमध्ये आणखी एक नियम लागू करण्यात आला आहे. ज्यामुळे पंचांना मोठा फायदा होणार आहे. त्यानुसार, डीआरएस ऐवजी स्मार्ट रिव्ह्यू सिस्टीम वापरली जाणार आहे. एका स्पोर्ट वाहिनीच्या अहवालानुसार, आता मैदानात 8 हॉक-आय कॅमेरे बसवले जाणार आहेत. हे कॅमेरे अचूक निर्णय घेण्यास मदत करतील. आता टीव्ही अंपायर त्याच खोलीत बसणार आहे, जिथे दोन हॉक-आय ऑपरेटर बसलेले असतील. आतापर्यंत टीव्ही ब्रॉडकास्टिंग डायरेक्टर टीव्ही अम्पायर आणि हॉक-आय ऑपरेटर यांच्यातील संपर्क म्हणून काम करत असतात. परंतु आता हॉक-आय कॅमेऱ्यातून काढलेली छायाचित्रे केवळ टीव्ही अंपायरसमोर सादर केली जाणार आहे.

स्मार्ट रिप्ले सिस्टीम टीव्ही अंपायरला स्प्लिट-स्क्रीन प्रतिमांसह अधिक व्हिज्युअल्सचा संदर्भ देण्याची परवानगी देईल. सीमारेषेवरील पहिल्या क्षेत्ररक्षकाने हवेत घेतलेल्या रिले कॅचचे उदाहरणासह सांगता येईल. याआधी प्रसारक बॉल पकडल्याच्या अचूक क्षणी क्षेत्ररक्षकाचा पाय आणि हातांची स्प्लिट स्क्रीन एकाच वेळी दाखवू शकत नव्हते. मात्र, नवीन प्रणाली अंतर्गत दोन्ही फुटेजसह स्प्लिट स्क्रीन अंपायरला जेव्हा चेंडू पकडला गेला किंवा सोडला गेला तेव्हा दाखवू शकता येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्मा पिकनिकला गैरहजर: मुंबई इंडियन्स आणि त्याच्यात अजूनही बिनसलेलेच?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -