घरक्रीडाRohit Sharma : रोहित शर्मा पिकनिकला गैरहजर: मुंबई इंडियन्स आणि त्याच्यात अजूनही...

Rohit Sharma : रोहित शर्मा पिकनिकला गैरहजर: मुंबई इंडियन्स आणि त्याच्यात अजूनही बिनसलेलेच?

Subscribe

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) स्पर्धेला अवघे दोन दिवस बाकी आहेत. सर्व संघाच्या खेळांडूंनी तयारीलाही सुरुवात केली आहे. मात्र आयपीएल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सची चर्चा होताना दिसत आहे. आयपीएलच्या 17 व्या पर्वात मुंबई इंडियन्स संघाची धुरा हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली आहे. यामुळे मोठा वाद रंगला होता. यंदाची आयपीएल रोहित शर्मा खेळणार की नाही? असे प्रश्न उपस्थित होत असतानाच दोन दिवसांपूर्वी रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा संघात सामील झाला. मात्र आता पुन्हा एकदा रोहित शर्माची चर्चा होताना दिसत आहे. कारण मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आलेल्या पिकनिकला तो गैरहजर होता. (Rohit Sharma absent from picnic Mumbai Indians and still without him)

हेही वाचा – Ajit Pawar : ज्यावेळेस दिलीप मोहिते पाटील मंत्री होतील तेव्हा मी…; अजितदादांचे मिश्किल भाष्य

- Advertisement -

मागील आयपीएलच्या अनेक पर्वात रोहित शर्माकडे असलेले मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे सोपविण्यात आले. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. यंदाची आयपीएल रोहित शर्मा खेळणार की नाही? रोहित शर्मा मुंबईच्या ताफ्यात कधी दाखल होणार? असे अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसले. अशातच दोन दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. ज्यात रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील झाल्याचे दिसत होते. यानंतर मुंबई इंडियन्सने आयपीएल सुरू होण्यापूर्वी संघातील खेळाडूंना एकत्र आणण्यासाठी पिकनिकचे आयोजन केले होते. मात्र या पिकनिकला रोहित शर्मा गैरहजर असल्याचे दिसले. त्यामुळे पुन्हा एकदा रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्स संघात सारे काही आलबेल नसल्याचे दिसत आहे.

हेही वाचा – Jayant Patil : द. नगरमधून ते निवडून येतील, पण…; निलेश लंकेंबाबत जयंत पाटलांचे मोठे विधान

- Advertisement -

मुंबई इंडियन्सने आपल्या खेळाडूंना एकत्र आणण्यासाठी अलिबाग येथील एका रिसॉर्टमध्ये पिकनिकचे आयोजन केले होते. यावेळी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या हा इतर खेळाडूंसह रिसॉर्टमध्ये जात असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. मात्र या व्हिडीओमध्ये माजी कर्णधार रोहित शर्मा दिसत नाही. रोहित शर्मा या माध्यमांतून आपली नाराजी दर्शवत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघ याबाबत आत खुलासा करणार का? हे पाहावे लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -