Sunday, May 5, 2024
घरमानिनीHealthTravel Tips : तुम्हालाही प्रवासात मळमळ, उलट्या होतात? करा हे उपाय

Travel Tips : तुम्हालाही प्रवासात मळमळ, उलट्या होतात? करा हे उपाय

Subscribe

अनेकांना लांबचा प्रवास करायला फार आवडते. पण नेहमीच अनेकांना प्रवासादरम्यान उलट्या किंवा मळमळ होण्याची समस्या उद्भवते, ज्यामुळे ते अस्वस्थ होतात. या त्रासामुळे अनेक वेळा अशा लोकांना कुठंही जायला आवडत नाही. वैद्यकीय भाषेत या आजाराला मोशन सिकनेस म्हणतात. मोशन सिकनेसमध्ये, कार, बस, जहाज, विमान, ट्रक इत्यादींमधून प्रवास करताना उलट्या किंवा मळमळ होण्याची समस्या असते. मोशन सिकनेसमुळे लोकांच्या प्रवासादरम्यान उलट्या थांबत नाहीत. मोशन सिकनेस हा काही फार गंभीर आजार नाही.पण प्रवासादरम्यान त्यामुळं खूप अस्वस्थ परिस्थिती निर्माण होते. प्रवासावेळी तुम्हाला उलटी येऊ नये, यासाठी काही खास टिप्स तुमच्यासाठी घेऊन आले आहोत.

प्रवासात ‘या’ महत्त्वाच्या टिप्स फॉलो करा

हलका आहार घ्या
कारमधून प्रवास करण्यापूर्वी हलके जेवण घ्या. जास्त तेलकट , तिखट आणि मसालेदार पदार्थ खाऊ नका. जास्त खाल्ल्याने प्रवासामध्ये मळमळण्याची शक्यता जास्त असते. तसंच जेवल्यानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर लगेचच कारमध्ये बसू नका. यामुळे देखील उलटी होण्याची शक्यता वाढू शकते.

- Advertisement -

भरपूर पाणी प्या
प्रवास सुरु करण्यापूर्वी भरपूर पाणी प्या. यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होईल. तसचं प्रवासातही अधूनमधून थोडं थोडं पाणी प्या. एकाचवेळी जास्त पाणी पिणं टाळा. अन्यथा तुम्हाला वारंवार लघवीला आल्याने प्रवासात अडचण निर्माण होवू शकते.

लवंग किंवा आंबट गोळ्या
कार प्रवासात मोशनसिकनेसचा त्रास रोखण्यासाठी कायम काही लवंग सोबत ठेवा आणि एखादी लवंग चघळा. तुम्ही काही आंबट चवीच्या गोळ्याही देखील चघळू शकता. यामुळे मळमळ कमी होईल.

- Advertisement -

डॉक्टरांचा सल्ला घ्या
कार प्रवासात तुम्हाला कायमच उलटी किंवा चक्कर येणं असा त्रास जास्त होत असल्यास तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने मोशन सिकनेसची औषधं घेऊ शकता. प्रवास सुरू करण्यापूर्वी 1 तास ही औषध घेतल्यास मोशन सिकनेसचा त्रास होत नाही.

सकाळी प्रवास करण्याआधी एका ग्लासात जिरे, धने आणि बडीशेप मिसळून ते संपूर्ण रात्र भिजवून ठेवा.हे प्यायल्यानंतर तुम्हाला प्रवासात उलटीचा त्रास होणार नाही.

प्रवासापूर्वी दही आणि डाळिंबाचे सेवन केल्याने प्रवासात उलटीच्या समस्येचा त्रास होणार नाही. फक्त दही खाल्ल्याचाही तुम्हाला फायदा होईल.

आल हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. प्रवासादरम्यान आले खाल्यास तुम्हाला आराम मिळू शकतो.

- Advertisment -

Manini