Wednesday, May 8, 2024
घरमानिनीHealthमुलांची उंची वाढवण्यासाठी करा हे उपाय

मुलांची उंची वाढवण्यासाठी करा हे उपाय

Subscribe

पर्सनेलिटीमध्ये जसं दिसणं, वागणं, बोलणं, चालणं महत्वाचे असते तशीच तुमची उंचीही महत्वाची असते. कारण उंच माणस ही चारचौघात उठून तर दिसतात शिवाय असे अनेक प्रोफेशन आहेत जिथे उंचीला फार महत्व आहे. यामुळे मुलांच्या उंचीप्रती पालक नेहमी अलर्ट असतात.

यामुळे वयोमानानुसार मुलांची अपेक्षित उंची वाढत नसेल तर पालक चिंताग्रस्त होतात.

- Advertisement -

मुलांची उंची वाढावी यासाठी मग वेगवेगळे प्रयत्न केले जातात.

त्यासाठी मग मुलांना उंच उड्या मारण्यास सांगितले जाते.

- Advertisement -

सायकलिंग, रनिंगबरोबरच बारला लटकवले जाते.

मुलांना कॅल्शियमच्या गोळ्या देण्यात येतात.

पण उंची फक्त धावणे, पळणे उड्या मारल्याने सायकलिंग केल्याने वाढत नसते.

तर त्यासाठी आनुवंशिक गुणसूत्र, हार्मेान्स आणि आहारही कारणीभूत असतो.

गुणसूत्र ही आनुवंशिकेतून आलेली असतात. हार्मेान्सही शरिरांतर्गत तयार होतात.

तर आहार हा मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयीतून येतो.

सामान्यत उंची वाढण्यासाठी मुलांच्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करावा.

मुलांना प्रोटीनयुक्त आहार द्यावा. जर मांसाहारी असाल तर अंडी,मासे, चिकन यांचा आहारात समावेश करावा.

शाकाहारी व्यर्तींनी पालक, पनीर, दूध,दही यासारख्या दुग्धजन्य पदार्थांचा मुलांच्या आहारात समावेश करावा.

 

 

- Advertisment -

Manini