Saturday, April 20, 2024
घरमानिनीHealthएकटेपणाची भावना दूर करण्यासाठी टिप्स

एकटेपणाची भावना दूर करण्यासाठी टिप्स

Subscribe

एकटेपणाचा मानसिक आरोग्यावर सर्वाधिक परिणाम होतो. पार्टनरसोबत ब्रेकअप ते कामाचे अपयश यासारख्या कारणांमुळे अनेकजण एकटेपणाशी झुंजत आहेत. एकटेपणा दीर्घकाळ राहिल्यास भावनिक आणि शारीरिक आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. जर तुम्हाला किंवा तुमच्या प्रियजनांपैकी कोणालाही एकटेपणा जाणवत असेल तर काही टिप्स फॉलो केल्यास एकटेपणाच्या समस्येपासून तुम्ही सुटका मिळवू शकता.

एकटेपणाची भावना मान्य करा –
सर्वात महत्वाचे म्हणजे एकटेपणाच्या भावनेवर मात करण्यासाठी तुम्हाला कसे वाटत आहे हे पहा. एकटेपणाचा तुमच्या आयुष्यावर कसा परिणाम होत आहे ते जाणून घ्या. एकटेपणाचा खूप जास्त परिणाम तुमच्यावर होत असेल तर थेरपीस्टशी बोलण्यास धजावू नका. तज्ज्ञांशी बोलून तुम्ही तुमची एकेटपणाच्या समस्येवर मात मिळवू शकता.

- Advertisement -

मित्रमंडळी किंवा कुटुंबियांशी बोला –
तुम्ही एकटेपणाशी लढा देत असाल तर अशावेळी मित्रमंडळी किंवा कुटुंबियांसोबत वेळ घालविणे फायद्याचे ठरेल. आपल्या मनात दडलेल्या भावना इतरांसोबत शेअर केल्याने मन हलके होते, ज्याने तुम्ही रिलॅक्स फील करता. मित्रमंडळी किंवा कुटुंबियांशी बोलून त्याच्यासोबत वेळ घालविल्याने आपल्यासोबत घडलेल्या एखादया वाईट घटनेचा आपल्याला विसर पडण्यास मदत होते. परिणामी, तुमच्यातील एकटेपणा दूर होतो.

ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा सकारात्मक पद्धतीने वापर –
ऑनलाईन जग इतरांशी कनेक्ट होण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. याचा योग्यरीत्या वापर केल्यास तुम्ही एकटेपणातून बाहेर येऊ शकता. मात्र, ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा चुकीचा वापर केल्यास तुम्ही एकटेपणाची भावना आणखीनच वाढू शकते. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करताना काळजीपूर्वक करा.

- Advertisement -

स्वतःला बिझी ठेवा –
एकटेपणाची भावना दूर करण्यासाठी स्वतःला बिझी ठेवण्यासारखा दुसरा उत्तम पर्याय नाही. घरातून बाहेर पडा, उद्यान, बागा यासारख्या ठिकाणी वेळ घालावा. जास्तीत जास्त लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयन्त करा. जेव्हा तुम्ही बाहेर वेळ घालविता तेव्हा आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर तुमचे लक्ष जाते त्यामुळे मनातील एकटेपणाची भावना दूर होण्यास मदत होते. तुम्ही जिम, लायब्ररी किंवा एखादा छंद सुद्धा जोपासू शकता.

 

 

 


हेही वाचा : छंद जोपासल्याने सुधारते मानसिक आरोग्य

 

- Advertisment -

Manini