घरदेश-विदेशA Ganeshamurthi: तामिळनाडूचे खासदार गणेशमूर्ती यांचा मृत्यू; तिकीट नाकारल्यानं केला होता आत्महत्येचा...

A Ganeshamurthi: तामिळनाडूचे खासदार गणेशमूर्ती यांचा मृत्यू; तिकीट नाकारल्यानं केला होता आत्महत्येचा प्रयत्न

Subscribe

चेन्नई : तामिळनाडूच्या इरोड लोकसभा मतदारसंघातील एमडीएमकेचे खासदार ए. गणेशमूर्ती (76) यांचे गुरुवारी सकाळी कोईम्बतूर येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. लोकसभेचे तिकीट न मिळाल्याने ते नाराज होते. त्यांनी रविवारी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सुरुवातीला त्यांना इरोड येथील स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना कोईम्बतूर येथील खासगी रुग्णालयात रेफर करण्यात आले. त्यांच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, गणेशमूर्ती यांनी रविवारी कीटकनाशक प्राशन केले होते, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर हार्टअटॅक आल्याने त्यांचा मृत्यू झाला. (A Ganeshamurthi Death of Tamil Nadu MP A Ganeshamurthi He tried to commit suicide after refusing the ticket)

तामिळनाडूतील द्रमुक पक्षाचे खासदार गणेशमूर्ती यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले. कोईम्बतूर येथील खासगी रुग्णालयात गुरुवारी पहाटे 5 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चार दिवसांपूर्वी त्यांनी कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता, तेव्हापासून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

समोर आलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने ते नैराश्यात होते, त्यामुळे त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, असा अंदाज वर्तवला जात आहे. कीटकनाशक प्यायल्यानंतर त्यांना उलटच्या होऊन अस्वस्थ वाटू लागलं होतं.

विष प्राशन केल्याची माहिती त्यांनी कुटुंबियांना सांगितल्यावर त्यांना प्रथम इरोड शहरातील रुग्णालयात आणण्यात आलं, मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला कोईम्बतूर येथील खासगी रुग्णालयात हलवले. जिथे त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

ECMO पद्धतीने उपचार सुरू होते

गणेशमुर्ती यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना ECMO प्रणालीवर ठेवले होते. मात्र, त्यांचे शरीर या उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. त्यांच्या मृत्यूवर द्रमुक पक्षाचे प्रमुख वायको म्हणाले की, रुग्णालयात दाखल करताना ते बेशुद्ध पडले होते, त्यांनी असे का केले हे आम्हाला माहीत नाही, असं त्यांनी सांगितलं.

(हेही वाचा: A Ganeshamurthi: तामिळनाडूचे खासदार गणेशमूर्ती यांचा मृत्यू; तिकीट नाकारल्यानं केला होता आत्महत्येचा प्रयत्न)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -