Tuesday, March 25, 2025
HomeमानिनीHealthमॉर्निंग एन्झायटीची ही आहेत कारणे

मॉर्निंग एन्झायटीची ही आहेत कारणे

Subscribe

आपण अनेकदा पाहिले असेल की, काही लोक सकाळी सकाळी हसत हसत उठतात, तर काही जणांची सकाळ खूप कठीण असते. या लोंकाना सकाळी कुणाशी बोलायला आवडत नाही. अनेक जणांची सकाळी चिडचिड होते. सकाळची चिडचिड ही मॉर्निंग एन्झायटी असू शकते. कधी कधी यामागे रात्रीची अपूर्ण झोप आणि दिवसभराची चिंता असू शकते. हल्ली बऱ्याच जणांना मॉर्निंग एन्झायटीचा त्रास जाणवतो. जाणून घेऊयात यामागील कारणे आणि त्यावरील उपाय

मॉर्निंग एन्झायटीची कारणे –

स्ट्रेस हार्मोन वाढणे – बरेच लोक सकाळी उठतात आणि त्यांना स्ट्रेस जाणवतो. शरीरात स्ट्रेस हार्मोन जाणवणे हा कोर्टिसोलच्या वाढीमुळे असे होऊ शकते. कॉर्टिसॉल शरीरातील स्ट्रेस, ब्लड प्रेशर, मेटॅबॉलिझम, शुगर नियंत्रित करते. कोर्टिसोलची पातळी कमी होणे किंवा वाढणे आरोग्यसाठी हानिकारक आहे.

कॅफिन – जास्त प्रमाणात कॅफिन आणि शुगर यामुळे एन्झायटीची समस्या वाढते. कॅफीनचे प्रमाण वाढल्याने स्ट्रेसची समस्या वाढते, ज्यामुळे मॉर्निंगची एन्झायटीचा त्रास जाणवू लागतो.

अपूर्ण झोप – झोपेची खराब गुणवत्ता देखील मॉर्निंग एन्झायटीचा त्रास वाढवू शकते. संशोधनानुसार, रात्रीची अपूर्ण झोप हे मॉर्निंग एन्झायटीचे मुख्य कारण मानले जाते. जे लोक रात्री गाढ झोपतात, त्यांच्या शरीरात हॅपी हार्मोन्स रिलीज होऊ लागतात.

मॉर्निंग एन्झायटीवर उपाय –

हेल्दी ब्रेकफास्ट – स्ट्रेसमुळे शरीरात होणारे अनेक बदल आपल्या आरोग्यावर परिणाम करतात. या प्रकारचे बदल आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी निरोगी खाणे खूप महत्वाचे आहे. ज्यामध्ये हेल्दी ब्रेकफास्ट सर्वात महत्वाचा आहे.

शारीरिक व्यायाम – स्ट्रेसची लेव्हल कमी करण्यासाठी व्यायाम खूप महत्वाचा ठरतो. व्यायामामुळे शरीराचा स्टॅमिना वाढतो आणि शरीरात हॅपी हार्मोन्स रिलीज होतात.

नकारात्मकतेपासून दूर राहा – नकारात्मकता हा आपला सर्वात मोठा शत्रू आहे. एखाद्या व्यक्तीने किंवा परिस्थितीने प्रभावित होऊन नकारात्मक विचारणा आपल्या लाइफस्टाइलचा भाग बनवू नका. अशाने झोप न लागण्याची समस्या उदभवते, ज्यामुळे स्ट्रेस वाढतो.

झोपण्याची आणि उठण्याची वेळ – तुमच्या डेली रुटीनमध्ये झोपण्याची आणि उठण्याची एकच वेळ ठरवा आणि त्याचे पालन सुद्धा करा. तुम्ही असे केल्याने झोपेची गुणवत्ता वाढेल आणि मेंदूला आराम मिळेल. ज्यामुळे तुम्हाला मॉर्निंग एन्झायटीचा उदभवणारा त्रास टाळता येईल.

 

 


हेही वाचा : 

Manini