Sunday, April 14, 2024
घरमानिनीHealthMorning Breakfast : सकाळच्या नाश्त्याची योग्य वेळ कोणती?

Morning Breakfast : सकाळच्या नाश्त्याची योग्य वेळ कोणती?

Subscribe

सकाळचा नाश्ता आपल्या संपूर्ण दिनचर्येवर परिणाम करणारा असतो, यासाठी सकाळचा नाश्ता आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. पण, नाश्ता करण्याची योग्य वेळ कोणती हे तुम्हाला ठाऊक आहे का? आपण योग्य वेळेत नाश्ता न केल्यामुळे आपली एनर्जी लेव्हल कमी होऊ शकते आणि याचा आपल्या दिवसभराच्या दिनचर्येवर परिणाम होतो. त्यामुळे निरोगी आरोग्यसाठी सकाळचा नाश्ता योग्य वेळेत करणे गरजेचे आहे.

फोर्ब्सच्या अहवालानुसार, नाश्ता न केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. याने स्ट्रेस, थकवा, लठ्ठपणा आणि डायबिटीसचा धोका वाढू लागतो. त्यामुळेच सकाळच्या नाश्त्याला अधिक महत्वपूर्ण मानले जाते. जर सकाळच्या नाश्त्याच्या वेळेबाबत बोलायचे झाल्यास लोकांनी सकाळी उठल्यानंतर 2 तासांच्या आत नाश्ता करावा. उठल्यानंतर जितक्या लवकर नाष्टा कराल तेवढं तुमच्या चयापचयासाठी उत्तम ठरते.

- Advertisement -

आणखीनच सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास सकाळी तुम्ही जर 5 वाजता उठत असाल तर 7 वाजेपर्यत नाश्ता करावा. जर तुम्ही 7 वाजता उठलात तर 9 वाजेपर्यंत नाश्ता करावा. सकाळी जिममध्ये गेल्यास वर्कआउटच्या 20 ते 30 मिनिट
आधी केळी किंवा अवकाडो सारखे हलके पदार्थ खा. काहीही न खाता तुम्ही जिममध्ये वर्कआउट करत असल्यास जिममधून आल्यानंतर नाश्ता करा.

- Advertisement -

रात्रीच्या जेवणाबद्दल सर्वोत्तम वेळेबद्दल बोलायचे झाल्यास रात्री झोपण्यापूर्वी कमीतकमी 2 ते 3 तास आधी रात्रीचे जेवण करणे गरजेचे आहे. असे केल्याने शरीराला पचनासाठी पुरेसा वेळ मिळेल. अन्न खाल्यानंतर लगेचच झोपल्यास अपचनाची समस्या उदभवू शकते. नुकत्याच समोर आलेल्या एका संशोधनानुसार, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण योग्य वेळी केल्याने शरीरावर जमा होणारी चरबी कमी होते आणि आजारांपासून बचाव होतो.

नाश्त्यामध्ये कोणते घटक असावेत-

सकाळच्या नाश्त्यात प्रोटिन्स, मिनरल्स, व्हिटॅमिन, फायबर्सयुक्त पदार्थ आदींचा समावेश असावा.

अंडी, मासे, दूध आदी पदार्थात प्रोटिन्स असते. उकडलेले अंड सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे.

शरीरासाठी पाणी फार गरजेचे असते. पाणी योग्य प्रमाणात, योग्य पद्धतीने, योग्यवेळी पिण्याचे फार महत्व आहे. त्यामुळे दिवसभर भरपूर प्रमाणात पाणी घेतलं पाहिजे.

सकाळच्या नाश्त्यात तुम्ही रंगीत फळे आणि भाज्यांचा आहार घ्यावा. ज्यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सीडेंट असतात. त्यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात एनर्जीने होते.

 

 

 


हेही वाचा : Kids Lunch Box : मुलांना टिफीन मध्ये द्या हे टेस्टी पदार्थ

 

- Advertisment -

Manini