Sunday, February 25, 2024
घरमानिनीBeautyस्लिम दिसण्याबरोबरच आकर्षक चेहऱ्यासाठी करा 'हे' व्यायाम

स्लिम दिसण्याबरोबरच आकर्षक चेहऱ्यासाठी करा ‘हे’ व्यायाम

Subscribe

बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेकांना चेहऱ्यच्या अनेक समस्या जाणवत आहेत. अनेकदा चेहऱ्यावर जमा झालेल्या चरबीमुळे आत्मविश्वासह कमी होतोय. परिणामी, चेहऱ्याचे सौंदर्य कमी होऊ लागते. अशावेळी आहारात काही बदल करण्यासोबतच फेस स्लिमिंगसाठी काही व्यायामाची मदत घेणे खूप फायदेशीर ठरते. चेहऱ्याच्या व्यायाम केवळ वृद्धत्वाच्या चिन्हापासून मुक्ती देत नाही तर त्वचेला ताजेपणा देखील देतो.

चेहऱ्याचा व्यायाम आपल्या दिनचर्येचा भाग बनवून चेहरा सहज आकर्षक बनवू शकतो. याने त्वचेची चमक आणि सौंदर्य वाढते. व्यायामाच्या मदतीने चेहऱ्याचे स्नायू मजबूत होतात तसेच चेहऱ्याची चमकही कायम राहते. दिवसातून केवळ १० ते १५ सेकंद व्यायाम केल्याने चेहऱ्याची जमा झालेली चरबी हळूहळू जळू लागते.

- Advertisement -

चेहऱ्याचे व्यायाम –

फिश पाऊट
गालांचे स्नायू सैल झाल्यामुळे त्वचेची लवचिकता कमजोर होऊ शकते. या समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘फिश पाऊट’ हा एक सोपा आणि उत्कृष्ट व्यायाम आहे. तोंडाच्या दोन्ही बाजूनी गाल आतल्या बाजूने खेचल्याने चेहऱ्याच्या स्नायूंवर ताण येतो. यामुळे चेहरा स्लिम दिसण्यासोबतच आकर्षकही दिसायला मदत होते.

- Advertisement -

माऊथ लिफ्ट
तोंडाच्या संभोवतालचे स्नायू मजबूत करण्यासाठी ‘माऊथ लिफ्ट’ हा व्यायाम करा. हे करण्यासाठी ओठ बाहेरच्या दिशेने हलवा. दीर्घ श्वास घ्या आणि 10 ते 15 सेकंद धरून ठेवा. यामुळे ओठांभोवतीचे स्नायू निरोगी होतात. याने चेहऱ्याची लवचिकता टिकून राहते.

कपाळ रेझर
भुवयांच्या आसपास दिसणाऱ्या बारीक रेषा वृद्धत्त्व दर्शवतात. यापासून सुटका होण्यासाठी तर्जनी आणि मधली बोटे भुवयांवर ठेवा आणि वरच्या दिशेने हलवा. यानंतर दोन्ही हातांनी भुवया वर करा. हे 8 ते 10 वेळा पुन्हा पुन्हा करा. याने स्नायूंमध्ये रक्ताभिसरण वाढते.

तोंडाचा बलून व्यायाम
चेहऱ्यची निस्तेज त्वचा ताणण्यासाठी तोंडाचा बलून व्यायाम अवश्य करा. यासाठी तुमच्या फुफ्फुसात साचलेली हवा बाहेर काढा आणि तोंडात फुग्यासारखी भरा. हे करताना दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. हा व्यायाम 5 ते 6 वेळा पुन्हा पुन्हा करा. असे केल्याने चेहऱ्याची त्वचा घट्ट होते.

ओठ ओढण्याचा व्यायाम
जबड्याच्या रेषेचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी ओठ ओढण्याचा व्यायाम करा. याने फायदा होईल. सर्वप्रथम डोके मागे घ्या आणि ओठ शक्य तितके वरच्या बाजूला खेचा. जेव्हा तुम्हाला जबड्याच्या ओळीवर ताण जाणवेल तेव्हा ओठ पुन्हा सामान्य स्थितीत आणा. हा व्यायाम तुम्ही दिवसातून 3 ते 4 वेळा करू शकता.

 

 


हेही वाचा ; सुरकुत्या कमी करण्यासाठी 10 सोपे घरगुती उपाय

 

- Advertisment -

Manini