Thursday, May 16, 2024
घरमानिनीHealthडाएट म्हणजे काय?

डाएट म्हणजे काय?

Subscribe

डाएट म्हटलं की, सर्वांच्या मनात वजन कमी करणे हा विचार सर्वात आधी येतो. पण फक्त वजन कमी करण्याला डाएट म्हणत नाही.. डाएट म्हणजे प्रत्येकाच्या शरीराला त्यांच्या BMR नुसार ठराविक प्रमाणात प्रोटीन, कार्बोहायड्रेट, डाएटरी फॅट्स, विटामीन्स, मिनरल्स आणि पाणी या 6 गोष्टींची गरज असते. यांना “आवश्यक पोषकतत्वे” असे म्हणतात. या पोषकतत्वांमुळे आपली एनर्जी लेव्हल वाढेल, रोगप्रतिकारक शक्ती वाढेल, पचनसंस्था सुधारायला मदत होईल आणि हे सर्व झाल्यावर आतून आपल्या शरीराचं नॅचरल डीटॉक्सीफिकेशन झाल्याने आपल्या त्वचेवर एक प्रकारची चमक येते. यासाठी आपण आरोग्यवर्धक आणि नुट्रिशियस अन्न खायला हवे. जे आपल वजन नियंत्रणात ठेवायला मदत करेल आणि आपला स्किन टोन, बॉडी टोन सुधारायला मदत करेल.

How to Create a Healthy and Sustainable Diet Plan for Weight Loss? - Lifepoint Multispecialty Hospital

- Advertisement -

डाएट म्हणजे विविध तऱ्हेचे अन्न जे आपल्या शरीराच्या सर्व गरजा पूर्ण करते, शरीराला सर्व पोषक द्रव्ये पुरवते आणि त्याचा थोडा अधिकचा साठा आपल्या शरीरात राखून ठेवते. म्हणजे कधी शरीराला कमी अन्नपुरवठा झाला किंवा रोजच्या आहारात काही बदल झाला तर गरजेच्या वेळी हा साठा उपयोगी पडू शकतो.

प्रत्येकाच्या शरीराचा एक BMR असतो BMR म्हणजे Basal Metabolic Rate हा प्रत्येकाच्या BMI वर अवलंबून असतो. BMI म्हणजे Body Mass Index हा प्रत्येकाच्या उंची, वजन, वय यानुसार ठरतो. यासोबतच प्रत्येकाचे पूर्वीचे काही आजार, दुखणी, एलर्जी, आनुवंशिक दोष, रक्तगट यानुसार प्रत्येकाचं डाएट प्लॅन हा वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे आंधळेपणाने एकाचा डाएट प्लॅन दुसऱ्याने फॉलो करू नये. त्याचे मोठे परिणाम तुमच्या शरीरावर होण्याची शक्यता असते.

- Advertisement -

एखाद्याचा डाएट प्लॅन हा त्या व्यक्तीसाठी वरदान ठरेल त्याचवेळी तो दुसऱ्यासाठी शाप असल्यासारखं काम करू शकतो, कारण दोघांची शरीराची गरज, आजार सर्व गोष्टी वेगवेगळ्या असतात. त्यामुळे सध्या सोशल मिडिया आणि इतर माध्यमातून “ग्रूप डाएट प्लॅन” च फॅड सुरू आहे त्याला बळी पडू नका.

Healthy Eating

कस्टमाइज् डाएट प्लॅन म्हणजे व्यक्तीपरत्वे वेगवेगळा डाएट प्लॅन जो तुमच्या हेल्थ हिस्टरी नुसार तुमच्या BMR calculation नुसार फक्त तुमच्यासाठी बनलेला असेल. तोच तुम्हाला जास्तीत जास्त चांगले रिझल्ट देऊ शकतो. कोणत्याही आजारावर गोळ्या, औषधे देताना डॉ सुध्दा तुम्हाला इतर तिन चार गोष्टी, लक्षण विचारतात आणि त्यातून तुम्हाला तुमच्या एकूण शरीराला मानवेल अशीच गोळ्या, औषधे तुम्हाला दिली जातात. त्यामुळे तुम्हाला तुमच्याबाबतची सर्व महिती, तुमच्या सवयी, कामाच्या पद्धती या सर्वांचा विचार करून एक कस्टमाइज डाएट प्लॅन दिला जातो तोच घ्यावा.

रेश्मा जाधव दोरके (नुट्रिशनीस्ट, फिटनेस कोच)

[email protected]


हेही वाचा :

Weight Loss : ‘नको जिम, नको डाएट’ फक्त फॉर्म्युला 30-30-30!

- Advertisment -

Manini