Tuesday, May 7, 2024
घरमानिनीHealthदिवसातून कितीवेळा जेवावे?

दिवसातून कितीवेळा जेवावे?

Subscribe

शरीरासाठी अन्न महत्वाचे असते. हे सर्वानाच माहित आहे. पण, निरोगी शरीरासाठी हे अन्न संतुलित असणे किती महत्वाचे आहे? याबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. अशा परिस्थितीत अनेक जण आरोग्याशी निगडित समस्यांना बळी पडतात, त्यामुळे याविषयी जागरूकता खूप महत्वाची आहे. अनेक जण शरीराचे पोषण व्हावे यासाठी दिवसातून खूप वेळा जेवतात. पण हे योग्य नाही. यासाठी दिवसातून किती वेळा खाणं आरोग्यसाठी फायदेशीर आहे हे माहित असणे आवश्यक आहे.

तज्ज्ञांच्या मते, अन्न पौष्टीक असण्यासोबतच ते योग्य वेळी घेणे महत्वाचे आहे. आजकालच्या व्यस्त जीवनात अनेक जण त्याच्या आहाराची योग्य काळजी घेत नाही. ज्याने ते आरोग्याशी संबंधित समस्यांना सहजरित्या बळी पडतात. जर आपण आरोग्यासाठी स्टॅंडर्ड डाइटबद्दल बोललो तर, शरीराच्या गरजेनुसार त्याने किती वेळा खावे हे मुखत्वे त्या व्यक्तीच्या शारीरिक स्थितीवर अवलंबून असते. खरं तर, एखादया विशिष्ट व्यक्तीची आरोग्य स्थिती आणि त्याच्या शारीरिक गरजांवर अवलंबून असते. यावरून दिवसातून किती वेळा खाणे त्याच्यासाठी फायदेशीर आहे हे ठरवता येते.

- Advertisement -

स्टॅंडर्ट डाईट –तज्ज्ञांच्या मते, सामान्य व्यक्तीसाठी सकाळ, दुपार आणि संध्याकाळी तीन वेळा अन्न घेणे चांगले मानले जाते. यामध्ये सकाळचा नाष्टा, दिवसा आणि रात्री घरचे सामान्य जेवण यांचा समावेश असतो. तुमचा सकाळचा नाश्ता असा असावा की, तो दिवसभर शरीराला आवश्यक ऊर्जा आणि पोषण देईल. त्यामुळे नाश्त्यात घेतलेल्या आहारातून शरीराला कार्ब्स तसेच प्रोटिन्स, व्हिटॅमिन आणि मिनरल्स पुरविणे चांगले. यासाठी नाश्त्यामध्ये तृणधान्ये तसेच दूध, रस आणि फळे यांचा समावेश असावा.

- Advertisement -

 

एका दिवसात किती जेवण घ्यावे –
दिवसाचे जेवण, सकाळचा नाष्टाच्या तुलनेत कमी कॅलरीज असणारे असावे. दिवसाच्या जेवणात तुम्ही दही सोबत सामान्य घरगुती डाळी, भात, भाकरी आणि भाज्या खाऊ शकतो. दही केवळ अन्न पचविण्यास मदत करत नाही तर शरीराला प्रोटीन आणि कॅल्शियम देखील प्रदान करते. रात्रीचे जेवण हलके आणि सहज पचणारे असावे. अशा स्थितीत रात्रीच्या जेवणात कमी कॅलरी आणि फायबरयुक्त पदार्थ खावे. यासाठी तुम्ही दलिया, स्प्राऊट्स सॅलड, सूप आणि ओट्सपासून बनवलेल्या गोष्टींचे सेवन करू शकता.

‘या’ लोकांनी दिवसातून 4 वेळा जेवावे –
तज्ज्ञांच्या मते, दिवसातून तीन वेळा जेवण करणे चांगले असते. पण, शारीरिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती किंवा विशिष्ट आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीने दिवसातून चार वेळा खाणे फायदेशीर असते. उदाहरणार्थ, डायबिटीसचा त्रास असलेल्या व्यक्तींनी दिवसभरत थोड्या थोड्या अंतराने अन्न घेणे आवश्यक असते कारण ते उपाशी राहिल्यास त्यांची समस्या वाढू शकते. अशा परिस्थितीत डायबिटिसने ग्रस्त असलेल्यांना दिवसातून 4 ते 5 वेळा हलका आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. यासोबतच जर एखादी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या कमकुवत असेल तर त्याने दिवसातून 4 वेळ आहार घेतला पाहिजे, ज्याने शरीरात ऊर्जा टिकून रहाते.

‘या’ लोकांनी दिवसातून 2  वेळच जेवणे चांगले –
तज्ज्ञांच्या मते, लठ्ठ व्यक्तींनी दिवसातून तीन वेळा खाण्याची कोणतीही सक्ती करू नये. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी अशा व्यक्तींनी दिवसातून दोनदाच जड जेवण जेवावे. उदाहरणार्थ, वजन कमी करण्यासाठी मधूनमधून उपवास करणे खूप प्रभावी आहे, ज्यामध्ये दोन जेवणामध्ये मोठे अंतर ठेवावे लागते. आजकल उपवास करण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. मात्र, त्याआधी आहार आपली शारीरिक गरज आहे हेही लक्षात घ्यायला हवे.

 

 


हेही वाचा : महिलांच्या ताटात नक्की असावे ‘हे’ सुपरफूड

 

- Advertisment -

Manini