Tuesday, April 30, 2024
घरमानिनीHealthDiet Plan : एका महिन्यातच होईल वजन कमी, फॉलो करा हा डाएट...

Diet Plan : एका महिन्यातच होईल वजन कमी, फॉलो करा हा डाएट प्लॅन

Subscribe

आजकाल लठ्ठपणाची समस्या अनेकांमध्ये दिसून येत आहे. लठ्ठपणामुळे लोकांची फिगर तर बिघडतेच शिवाय अनेक आजाराचा धोकाही निर्माण होतो. लठ्ठपणा वाढत गेला की, लोक तासनतास त्या जिममध्ये घाम गाळतात. पण तरीही हवा तास परिणाम दिसत नाही. जर तुम्हीही वजन कमी करण्यासाठी पर्याय शोधत असाल तर तज्ज्ञांनी दिलेला एक डाएट प्लॅन आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही फक्त एका महिन्यात 3 ते 6 किलो वजन कमी करू शकता.

- Advertisement -

डाएट प्लॅन –

अर्ली मॉर्निंग – तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला उठल्याबरोबर चहा किंवा कॉफी प्यायची सवय असेल तर ती आजच सवय सोडून द्या. त्याऐवजी एक ग्लास पाणी प्या. त्यानंतर कोथिंबीर आणि मेथीचे पाणी प्या. या बियांमध्ये अँटीऑक्सीडेंट्स आणि फायबर असतात, जे शरीराला डीटॉसिफाय करतात आणि शरीराचे पचन सुधारतात.

- Advertisement -

मिड मॉर्निंग – मिड मॉर्निंगमध्ये एक कप ग्रीन टी , एक सफरचंद आणि चार बदाम खा. ग्रीन टी शरीराला डिटॉक्सीफाय करते, बदामामध्ये हेल्दी फॅट्स, प्रोटिन्स आणि फायबर असतात, ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.

मॉर्निंग ब्रेकफास्ट – एक वाटी दही आणि गव्हाची पनीर स्टफ केलेली चपाती खा. दही आणि पनीरमध्ये प्रोटिन्स असतात. यामुळे तुम्हाला जास्त वेळ भूक लागत नाही.

दुपारचा लंच आणि स्नॅक्स – दुपारच्या लंचमध्ये एक वाटी रायत्यासोबत भाजीची खिचडी खावी लागेल. खिचडीमध्ये भाज्या घातल्याने फायबरचे प्रमाण वाढते आणि जास्त खाणे टाळले जाते. तर संध्याकाळी स्नॅक्स म्हणून तुम्हाला एक कप लिंबाचा चहा घ्यावा लागेल. चहासोबत तुम्ही कोणत्याही बिया खाऊ शकता.

रात्रीचा डिनर – रात्रीच्या जेवणात एक मोठी वाटी तळलेली मुगडाळ घ्या, यात तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या मिक्स करू शकता. यात हाय प्रोटिन्स आणि कमी कॅलरी असतात. ज्याने वजन कमी होण्यास मदत मिळते. रात्रीच्या जेवणानंतर 500 मिली फ्रुट स्मूदी तुम्ही पिऊ शकता.

हा डाएट प्लॅन फॉलो करताच तुमचे वजन कमी व्हायला मदत होईलच पण त्यासोबत हेही लक्षात घ्या तुम्ही डाएट प्लॅन सोबत शारीरिकरीत्या सक्रिय असणे गरजेचे आहे.

 

 

 

 


हेही पहा : Health Care Tips : Ro फिल्टरचे पाणी प्यावे की नाही?

- Advertisment -

Manini