Thursday, May 9, 2024
घरमानिनीHealthअँटीऑक्सीडेंट्स शरीरासाठी महत्वाचे का?

अँटीऑक्सीडेंट्स शरीरासाठी महत्वाचे का?

Subscribe

शारीरिक समस्यांपासून बचाव करण्यापासून ते त्वचा आणि केसांच्या आरोग्याला चालना देण्यासाठी, आहारात अँटीऑक्सीडेंट्सचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. पण, यासाठी अँटीऑक्सीडेंट म्हणजे काय? त्याचे स्रोत कोणते हे माहित असणे आवश्यक आहे. अँटीऑक्सीडेंट्स हे एक कंपाउंड आहे जे ऑक्सिडेशन प्रतिबंधित करतात. ऑक्सिडेशन ही एक केमिकल प्रकिया आहे फ्री रॅडिकल्स तयार करू शकते.

अँटीऑक्सीडेंट शरीरासाठी इतके महत्वाचे का?
अँटीऑक्सीडेंट्स रॅडिकलची निर्मिती रोखून फ्री रॅडिकल्समुळे होणारे टिशूंचे नुकसान रोखतात. अँटीऑक्सीडेंट्स समृद्ध आहारामुळे हृदयरोग, कॅन्सर यासह अनेक रोगांचा धोका कमी होतो. अँटीऑक्सीडेंट शरीराच्या पेशींमधून फ्री रॅडिकल्स काढून टाकतात आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे होणारे नुकसान टाळतात किंवा कमी करतात. तथापि, एका संशोधनानुसार, कृत्रिम अँटीऑक्सीडेंट्स मानवी आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे घोषित करण्यात आले आहे.

- Advertisement -

अँटीऑक्सीडेंट्स फूड्स –

डार्क चॉकलेट – डार्क चॉकलेटमध्ये 75anti टक्क्याहून अधिक प्रमाणात कोको असते. जे महत्वपूर्ण अशा मिनरल्स आणि अँटी ऑक्सीडेंटड्सने परिपूर्ण असते. एका अभ्यासानुसार, कोकोमध्ये असलेले अँटीऑक्सीडेंट आरोग्यसाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतात. हृदयाशी संबधीत समस्यांचा धोका देखील मर्यदित करते.

- Advertisement -

ब्लूबेरी – ब्लूबेरी अनेक महत्वाच्या पोषक तत्वांसह अँटीऑक्सीडेंट्सचा समृद्ध स्रोत आहे. यासोबतच त्यात कॅलरीजचे प्रमाणही खूप मर्यादित असते. शरीरात अँटीऑक्सीडेंट्स पुरविण्यासाठी आहारात ब्लूबेरीचा समावेश अवश्य करावा. याच्या नियमित सेवनाने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते, तसेच ब्लड ब्रेशरही सामान्य राहते.

स्ट्रॉबेरी – स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. याच्या नियमित सेवनाने हृदयाच्या आरोग्यसाठी तसेच त्वचा आणि केसांच्या आरोग्यसाठी खूप फायदेशीर मानले जाते.

पालक – पालक अनेक महत्वाच्या व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सीडेंट्सने समृद्ध आहे. यासह पालकामध्ये मर्यदित प्रमाणात कॅलरीज आढळतात. पालकांमध्ये दोन विशेष प्रकारचे अँटीऑक्सीडेंट आढळतात, जे हानिकारक अतिनील किरणांपासून डोळयांचे संरक्षण करतात.

मसाले आणि औषधी वनस्पती – आले हळद, लसूण आदी पदार्थासोबत रोझमेरी, अजमोदा तुळस आदी औषधी वनस्पतींमध्ये अनेक महत्वाची व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सीडेंट्स आढळतात. विविध पदार्थ बनविण्यासाठी त्यांच्या वापर केल्याने अन्नपदार्थांची गुणवत्ता वाढते आणि शरीरावरील ऑक्सिडेटिव्ह तणावाचा प्रभाव देखील कमी होतो.

 

 

 


हेही वाचा : पाणी पिण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत

- Advertisment -

Manini