Monday, April 29, 2024
घरमानिनीHealthऑक्सिडेटिव्ह ताण म्हणजे काय?

ऑक्सिडेटिव्ह ताण म्हणजे काय?

Subscribe

ऑक्सिडेटिव्ह तणाव ही एक समस्या आहे ज्यामध्ये शरीराला अकाली वृद्धत्व येते. तसेच ऑक्सिडेटिव्ह तणावामध्ये अनेक प्रकारचे रोग तुम्हाला प्रभावित होऊ शकतात. ताण तणाव ही असाही समस्या आहे जी प्रत्येकाला एक विशिष्ट काळानंतर येऊ लागते. पण तुम्ही कधी ऑक्सिडेटिव्ह तणावाबद्दल ऐकले आहे का ? हा ताण तणाव नॉर्मल तणावापेक्षा खूप वेगळा आहे. तसेच हा ताण तणाव लगेच तुम्हाला समजत नाही. या तणावाच्या संबंधित अनेक गोष्टी आहेत ज्या तुमच्या शरीरात काहीं काळानंतर दिसून येतात. जसे की वेळेपूर्वी आजारी पडणे. वृद्धत्व येणे आणि सारखा अशक्तपणा येणे. या समस्या शरीरात वाढू लागतात. जर का समस्यांकडे तुम्ही दुर्लक्ष केले तर याचे परिणाम तुम्हाला जास्त होऊ शकतात. त्यामुळे वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

ऑक्सिडेटिव्ह तणाव म्हणजे शरीरातील मुक्त रॅडिकल्स आणि अँटिऑक्सिडंट्स यांच्यातील समन्वयातील बिघाड, ज्यामुळे पेशी आणि शरीरातील ऊतींचे नुकसान होऊ शकते. त्याचा परिणाम त्वचेच्या बाहेरील भागांवर दिसून येतो. तसेच, जर तुम्ही दीर्घकाळ ऑक्सिडेटिव्ह तणावाच्या स्थितीत राहिल्यास, कर्करोग, मधुमेह आणि हृदयाशी संबंधित गंभीर आजार यांसारख्या दीर्घकालीन स्थितीचा धोका तुम्हला होऊ शकतो.

- Advertisement -

Antioxidants | Free Full-Text | The Impact of Oxidative Stress on  Pediatrics Syndromes

ऑक्सिडेटिव्ह तणाव या प्रकारे टाळा-

  • B12 च्या कमतरतेमुळे ऑक्सिडेटिव्ह तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शरीरात या व्हिटॅमिन्सची कमतरता भासू देऊ नका. तसेच
  • योग्य जीवनशैलीचा अवलंब करा.
  • नियमित अँटिऑक्सिडंट्स आहारात जास्त प्रमाणात घेतले पाहिजेत.
  • हंगामी फळे आणि भाज्यांचे सेवन करणे शरीरासाठी उत्तम राहील.
  • जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नियमित व्यायाम करावा.
  • रेडिएशनच्या संपर्कात येऊ नका.
  • धुम्रपानापासून दूर राहा.

हेही वाचा :  हार्मोन्स balance राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा..

- Advertisment -

Manini