Saturday, April 27, 2024
घरमानिनीBeautyBeauty Tips : डोक्यात सतत खाज येते, करा हे उपाय

Beauty Tips : डोक्यात सतत खाज येते, करा हे उपाय

Subscribe

प्रत्येकाला निरोगी, आणि दाट केस आवडतात. मात्र, या जगात बहुतांश लोकांना केसांशी संबंधित एकतरी आजार असतो. डँड्रफ, केसगळती या समस्या तर अनेकांना असतात. याबरोबरच डोक्याला खाज येण्याच्या समस्येने कित्येक जण त्रस्त असतात. यासाठी केसांचा स्काल्प कधीच कोरडा होऊ देऊ नका. पण काही खास घरगुती टिप्स वापरल्या तर या समस्येपासून मुक्तता मिळवता येऊ शकते.

डोक्याला खाज सुटण्याचे कारण काय?

डोक्याला खाज सुटणे ही तशी सामान्य समस्या आहे. या समस्येपासून कित्येक जण त्रस्त असताना आपण पाहतो. केसांमध्ये कोरडेपणा, मानसिक तणाव, केसांसाठी हानिकारक असलेल्या प्रोडक्ट्सचा वापर, केसांची तसेच केसांखाली असलेल्या त्वचेची स्वच्छता न राखणे या कारणांमुळे केसांना तसेच केसांखाली असलेल्या त्वचेला खाज येते. खाली दिलेले काही नैसर्गिक आणि घरगुती उपाय ट्राय करुन तुम्ही डोक्याला येत असेलल्या खाजेपासून स्वत:ची सुटका करु शकता.

- Advertisement -

दही

दह्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन बी12, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम आढळतात आणि त्यात इतरही अनेक गुणधर्म असतात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. केसांची खाज दूर करण्यासाठीही दह्याचा वापर केला जाऊ शकतो. खोबरेल तेल आणि दही एकत्र करून केसांना लावा आणि काही वेळ मसाज करा. यानंतर केस चांगले धुवावेत. काही दिवसातच डोक्याची खाज कमी होईल.

लिंबाचा रस

डोक्याला खाज येत असल्यास लिंबाच्या रसाचा वापर करा. दोन-तीन चमचे लिंबाचा रस कापसावर घ्या. त्यानंतर हा लिंबाचा रस टाळूवर लावा आणि दहा मिनिटे राहू द्या. नंतर कोमट पाण्याने डोके धुऊन टाका. लिंबाच्या रसात अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे डोक्याची खाज बंद होण्यासाठी मदत मिळेल.

- Advertisement -

कोरफडीचा गर व तेल

कधी कधी डोक्याची त्वचा कोरडी पडल्यामुळे खाज येत असते. अशावेळी खोबऱ्याचे तेल किंचित गरम करून मालीश करा. खोबऱ्याचे तेल उत्कृष्ट मॉइश्चरायझर आहे. त्याचा प्रभाव थंड असतो. ज्यामुळे खाजेपासून मुक्तता मिळते. कोरफडीच्या गराचा वापर केस सुंदर, मजबूत तसेच डॅंड्रफ फ्री करण्यासाठी केला जातो. डोक्याला येणारी खाज थांबवण्यासाठी केसांच्या मुळापाशी कोरफडीचा गर लावून हलक्या हाताने चोळा. असे केल्याने कोंडा नाहीसा होऊन खाज येणे बंद होईल.

बेकिंग सोडा

डोक्याला येणारी खाज थांबवण्यासाठी बेकिंग सोडा आणि पाण्याचे मिश्रण टाळूवर लावा. १५ मिनिट राहू द्या. नंतर थंड पाण्याने धुऊन घ्या. असे केल्याने डोक्याला येणारी खाज बंद होण्यास मदत मिळेल. केसांची तसेच केसांखाली असलेल्या त्वचेची स्वच्छता न राखल्याने खाज येते. म्हणून केस वेळच्या वेळी धुण्याची सवय लावा.

ऑलिव्ह ऑईल

ऑलिव्ह ऑईल गरम करून कोमट होऊ द्या. हे तेल डोक्याच्या त्वचेवर लावून चांगली मालीश करा. हे तेल रात्रभर राहू द्या आणि सकाळी धुऊन घ्या.

या गोष्टी लक्षात ठेवा

  • जेव्हा डोक्याला तीव्र खाज येते तेव्हा केस जास्त खाजवू नये.असे केल्याने केस कमकुवत होतात आणि या काळात इतर काही समस्या देखील उद्भवू शकतात. त्याचबरोबर केस खरवडण्यासाठी कंगव्याचा जास्त वापर करू नये. असे केल्याने आराम मिळतो परंतु असे केल्याने केस गळण्याची समस्या सुरू होते.
  • या उपायंसोबत तुमच्या रोजच्या जगण्यात थोडा बदल केलात, तरी डोक्यावरील खाज कमी होऊ शकते. योग, ध्यान, व्यायाम करुन तणावाचे नियोजन केल्यानंतर फरक जाणवू शकतो. यासोबतच पौष्टिक आणि जीवनसत्वांनी युक्त असणाऱ्या अन्नाचे सेवन करावे. आहारात व्हिटॅमिन ए, सी, ई, अमिनो अॅसिड, बादाम, मेथी, हळद असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यानेसुद्धा या समस्येपासून मुक्तता मिळू शकते.
- Advertisment -

Manini