Wednesday, May 1, 2024
घरमानिनीHealthपाणी पिण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत

पाणी पिण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत

Subscribe

शरीर निरोगी ठेवण्यासाठी अन्नासोबत पाणी देखील महत्वाचे असते. तज्ज्ञ कायमच शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला देतात. पाणी एकाच जागी बसून पिण्याचा सल्ला आयुर्वेदात देण्यात आला आहे. असे केल्याने शरीराच्या तापमानानुसार पाणी शरीरात पोहोचते. पाणी शरीररला डिटॉक्सीफाय करण्यापासून ते शरीराच्या सर्व भागांमध्ये आवश्यक पोषक द्रव्ये पोहोचविण्याची महत्वाची भूमिका बजावते. तज्ज्ञांच्या मते, सकाळपासून रात्री झोपेपर्यत पाणी पिण्याचे अनेक नियम आहेत. त्यांनी दिलेल्या वेळेनुसार पाणी प्यायलास शरीराला अनेक फायदे मिळतात.

पाणी पिण्याची योग्य पद्धत –

- Advertisement -
  • तज्ज्ञांच्या मते, सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी पाणी प्यावे. सकाळी उठल्यावर तुम्ही 1 ते 2 ग्लास पाणी पिऊ शकता.
  • सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिताना एक गोष्ट लक्षात घ्या, थंड पाणी पिऊ नका त्याऐवजी कोमट पाणी किंवा रुम टेम्परेचरवरील पाणी प्या.
  • असे केल्याने पचनसंस्था ट्रॅक्ट स्वच्छ होते आणि आतड्यातील साचलेली सर्व विषारी द्रव्ये शरीरातून काढून टाकली जातात.
  • जेवण करण्यापूर्वी नेहमी अर्धा तास आधी पाणी प्यावे. असे केल्याने पाणी आतड्यांमधून विषारी पदार्थ काढून टाकते आणि पचनसंस्था अन्न पचविण्यासाठी योग्यरीत्या कार्य करण्यास सक्षम होते.

  • जेवण झाल्यानंतर लगेचच पाणी प्यायलास ओव्हरहायड्रेशनची समस्या जाणवू शकते.
  • एकाचवेळी खूप जास्त पाणी पिण्याऐवजी कायम पाणी थोडे थोडे करून प्यायला हवे.
  • अंघोळीपूर्वी पाणी जरूर प्या. याने हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि मूडही सुधारतो.
  • उभे राहून अथवा घाईघाईत पाणी कधीच पिऊ नये. त्यामुळे कोणतेही अवयव स्वच्छ न करता पाणी थेट आतड्यात पोहोचते आणि विषारी पदार्थ शरीरात जमा होतात.
  • तज्ज्ञांच्या मते, जेवताना कधीच पाणी पियू नये.
  • प्लॅस्टिकच्या बॉटलमधील पाणी प्यायल्याने हार्मोनल संतुलन बिघडते.
  • शरीरातील हायड्रेशन कायम राहण्यासाठी दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी प्यायला हवे. यापेक्षा कमी पाणी प्यायलास अशक्तपण आणि डोकेदुखीचा त्रास संभवतो.
  • पाणी योग्य प्रकारे प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

 

- Advertisement -

 

 


हेही वाचा : दिवसातून कितीवेळा जेवावे?

 

- Advertisment -

Manini