घरदेश-विदेशNCP-SP : डिजिटल इंडिया धोरण स्वत:साठी जोरात, एनसीपी-एसपीचे भाजपावर शरसंधान

NCP-SP : डिजिटल इंडिया धोरण स्वत:साठी जोरात, एनसीपी-एसपीचे भाजपावर शरसंधान

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. भाजपाने प्रचाराला सुरुवात केली असून त्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करण्यास सुरुवात केली आहे. तथापि, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने यावर आक्षेप घेत, डिजिटल इंडिया धोरण स्वत:साठी जोरात असल्याची टीका भाजपावर केली आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : आमची तयारी एक पाऊल पुढे जाण्याची, राऊतांनी काँग्रेसला का दिला इशारा?

- Advertisement -

देशात सलग तिसऱ्यांदा भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता स्थापन करणार असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. यासाठी ‘अब की बार 400 पार’चा नाराही भाजपाकडून देण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर भाजपाकडून केला जात आहे. भारत सरकारच्या ‘विकसित भारत संपर्क’ नावाने नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जात असून पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना पत्र लिहिले आहे. या पत्रात पंतप्रधानांनी देशातील जनतेला ‘परिवारजन’ म्हणजे ‘कुटुंबातील व्यक्ती’ असे संबोधले आहे.

- Advertisement -

आपल्याला सोबत येऊन आता एक दशक पूर्ण होत आहे. विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी तुमचा पाठिंबा आणि तुम्ही दिलेल्या सूचना महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे, कृपया आपल्या विविध सूचना आणि मत आम्हाला कळवा, असे आवाहन या पत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

हेही वाचा – INDIA Vs NDA : मुंबईतील एका सभेनेच हुकूमशहांच्या 70 जागा कमी केल्या, ठाकरे गटाचा निशाणा

यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने (एनसीपी-एसपी) टीका केली आहे. आचारसंहिता लागू असतानाही ‘विकसित भारत’च्या आडून पंतप्रधान मोदी आणि भाजपाचा प्रचार सुरू आहे. केंद्राच्या आयटी मंत्रालयामार्फत आचारसंहितेचे उल्लंघन केले जात असून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून भाजपाची प्रचार मोहीम बेकायदेशीरपणे राबवली जात आहे, असे एनसीपी-एसपीने म्हटले आहे. पक्षाच्या प्रसिद्धीसाठी खोटे बोल पण रेटून बोल, ही भूमिका घेत, आता भाजपाकडून आचारसंहितेचा भंग करत स्वतःच्याच सरकारी यंत्रणांचा वापर केला जात आहे. परंतु सुजाण जनता या ढोंगीपणाला बळी पडणार नाही, असा विश्वास एनसीपी-एसपीने व्यक्त केला आहे.

हेही वाचा – Thackeray vs BJP : ठाकरेंचे देशभक्त चालत नाही, पण…, व्हिडीओद्वारे ठाकरे गटाचा भाजपाला टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -