आपण नेहमी नेहमी तीच तीच भाजी खाऊन कंटाळतो. अशावेळी चमचमीत वेगळे खावेसे वाटते. अशावेळी ढोबळी मिरचीचं रायतं नक्की करून बघाच. चवीला मस्त लागणारी ढोबळी मिरचीचं रायतं एकदा करूनच पाहा. अशातच आता जाणून घेऊया चमचमीत ढोबळी मिरचीचं रायतं याला लागणारे साहित्य आणि कृती…
साहित्य
- 4 किंवा 6 मोठ्या रसरशीत ढोबळी मिरच्या.
- चमचाभर – दही.
- चवीनुसार मीठ.
- 3 टी स्पून मेतकूट.
- अर्धी चिमूट साखर.
- थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती
- सर्वप्रथम चांगल्या मोठा रसरशीत ढोबळी मिरच्या घ्याव्यात. त्या धुवून पुसाव्यात.
- वांग्याचं भरीत करताना वांग्याला तेलाचा हात लावतो ना त्याप्रमाणे मिरच्यांना तेलाचा हात लावावा.
- नंतर मिरच्या गॅसवर चांगल्या भाजाव्यात जरा गार झाल्यावर हातानं वरवरचं काळं झालेलं साल काढून टाकावं.
- हे झाल्यावर मिरच्या चिरून बारीक तुकडे करावेत.
- यानंतर ढोबळी मिरचीचा मधला गाभा बियांसकट काढून टाकावा.
- आता या मिरच्यांच्या तुकड्यांवर चमचाभर दही, मेतकूट, मीठ, अर्धी चिमूट साखर हे सर्व घालून कालवावं.
- आणि मग त्यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पेरावी.
- अशातच आता तयार आहे चमचमीत ढोबळी मिरचीचं रायतं.
हेही वाचा : Recipe: पावसाळ्यात बनवा कर्टुल्याची भाजी
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -