Sunday, April 28, 2024
घरमानिनीKitchenMonsoon Tips : पावसाळ्यात लोणचं खराब होऊ नये यासाठी उपयुक्त टिप्स

Monsoon Tips : पावसाळ्यात लोणचं खराब होऊ नये यासाठी उपयुक्त टिप्स

Subscribe

पावसाळा चालू झाला कि घरगूती पदार्थांची खूप काळजी घ्यावी लागते. अशातच लोणची जी असतात यांना पावसाळ्यात लगेच फंगस पकडते. अशावेळी लोणची ही फार जपावी लागतात. लोणची फार काळ टिकण्यासाठी लोणची मुरताना आपण बऱ्याच गोष्टी घालतो. पण तरी देखील लोणच्याला जरा पण दमटपणा लागला तरी ती लोणची लगेच खराब पडतात. अशावेळी साठवणीचे पदार्थ कसे जपावे हे पाहणार आहोत आणि विशेषतः लोणचे खराब होऊ नये म्हणून अशी काळजी घ्या. तसेच लोणचे साठवताना या टिप्स नक्की फॉलो करायला विसरू नका…

लोणचं खराब होऊ नये यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो-

  • लोणचे साठवण्यासाठी योग्य डबा किंवा बॉक्स निवडणे फार महत्वाचे आहे.
  • डब्याच्या आत ओलावा पोहोचल्यामुळे बुरशी वाढू लागते.
  • अशावेळी लोणचे साठवण्यासाठी नेहमी एअर टाईट आणि पूर्णपणे कोरडा डबा वापरावा.
  • तुमच्याकडे भरपूर लोणचे असल्यास, ते साठवण्यासाठी लहान लहान डब्यात काढून वापरा.
  • यामुळे लोणच्याला फंगस लागली तरी खराब होणार नाही.
  • लोणच्यांमध्ये तेल आणि मीठ जास्त घाला,जेणेकरून ते जास्त काळ चांगले राहील.
  • ज्या लोणच्यात तेल, मीठ आणि इतर मसाले समान प्रमाणात मिसळले जात नाहीत किंवा जी तेलात पूर्णपणे मुरलेली नसतील त्यांचा ओलाव्यापासून बचाव करण्यासाठी अतिरिक्त मीठ आणि तेल वेगळे घालावे.

How to Pickle Fruits and Veggies - Mum's Pantry

लोणच्याला बुरशी लागल्यास ‘हे’ उपाय करा

  • लोणच्याला आंबट किंवा घाण वास येत असेल किंवा बुरशी वाढू लागली असेल तर लोणचे एकदा तपासून पाहा.
  • जर फंगस बरणीवर पसरली नसेल, तर जेवढ्या भागाला फंगस लागलेली आहे तो भाग काढून टाका आणि उरलेली लोणची वेगळ्या बरणीत भरून ठेवा.
  • आता यामध्ये व्हाईट व्हिनेगर घाला आणि दोन आठवडे हे लोणचे रोज उन्हात ठेवा.
  • व्हिनेगरचा वास त्यामध्ये फंगस वाढ होण्यापासून थांबवतो. यासोबतच लोणच्याची टेस्टही चांगली होते.
  • लोणचे डब्यातून काढताना नेहमी कोरडा आणि स्वच्छ चमचा वापरा.
  • चुकूनही जर लोणच्यात पाण्याचा एक थेब त्यात पडला तरी लोणचे खराब होऊ शकते.

हेही वाचा :

Monsson Tips : पावसाळ्यात जास्त दिवस ‘असं’ टिकवा आलं

- Advertisment -

Manini