घरमहाराष्ट्रपुणेपिंपरी-चिंचवडमध्ये 6500 परवडणाऱ्या घरांची होणार निर्मिती; गृह प्रकल्पाचा दुसरा टप्पा कसा असणार?

पिंपरी-चिंचवडमध्ये 6500 परवडणाऱ्या घरांची होणार निर्मिती; गृह प्रकल्पाचा दुसरा टप्पा कसा असणार?

Subscribe

पुणे : परवडणाऱ्या दरामध्ये घरे विकत घेण्याचा विचार करणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्यमवर्गीय कामगारांना हक्काची घरे बांधून देण्यासाठी ‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’ने (PMRDA) परवडणाऱ्या दरामध्ये घरे बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पिंपरी-चिंचवडमधील पेठ क्रमांक 12 येथील गृहसंकुलानंतर (टप्पा 1) पुढील टप्प्यासाठी ‘पीएमआरडीए’ने हालचाली सुरू केल्या आहेत. (6500 affordable houses to be constructed in Pimpri Chinchwad How will the second phase of the housing project be)

हेही वाचा – Uddhav Thackeray : देशात ‘राईट टू रिकॉल’ची गरज; उद्धव ठाकरेंची मागणी

- Advertisement -

‘पीएमआरडीए’कडून दुसऱ्या टप्प्याच्या गृहप्रकल्पात तब्बल 47 इमारती बांधण्यात येणार आहेत. या 47 इमारतीमध्ये एकूण 6 हजार 452 घरांची निर्मिती करण्यात येणार असून त्यासाठी 730 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसेच हा गृहप्रकल्प पुढील दोन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ‘पीएमआरडीए’ने निर्धारित करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड उद्योगनगरी असल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो नागरिक गेली कित्येक वर्ष शहरात मोठ्या प्रमाणावर वास्तव्यस राहतात. पंरतु एवढी वर्ष होऊनही त्यांना घराच्या वाढत्या किमतीमुळे आजपर्यंत स्वत:चे हक्काचे घर घेता आलेले नाही. त्यामुळे हे सर्व नागरिक भाडेकरार करून राहतात. अशा मध्यमवर्गीय कामगारांना हक्काची घरे बांधून देण्यासाठी ‘पीएमआरडीए’ने पुढाकार घेतला आहे. पिंपरी-चिंचवडमधील पेठ क्रमांक 12 येथील भूखंडावर ‘टप्पा 1’ अंतर्गत चार हजार ८३३ घरे उभारण्यात आली असून यापैकी 3 हजार 100 घरांच्या ताबा पावत्या लाभार्थ्यांना नुकत्याच वितरीत करण्यात आल्या आहेत. तसेच उर्वरित घरांचे हस्तांतर सुरू असून या प्रकल्पाला लागूनच असलेल्या भूखंडावर ‘टप्पा-२’ अंतर्गत आणखी घरांची निर्मिती करण्याची तयारी ‘पीएमआरडीए’ने सुरू केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अजित पवार बिनखात्याचे उपमुख्यमंत्री आणि इतर…; मंत्रिमंडळ विस्तारावरून राऊतांचा सरकारला टोला

केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून निधी उपलब्ध होणार

दुसऱ्या टप्प्यात आर्थिक दुर्बल घटकासाठी आणि अल्प उत्पन्न गटासाठी घरे बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पात 47 इमारती बांधण्यात येणार असून एकूण 6 हजार 452 घरे उभारली जाणार आहेत. या इमारतींमध्ये 3.234 ‘वन बीएचके’, 321 ‘वन आरके’ आणि दोन प्रकारांतील 2754 ‘टू बीएचके’ घरे असणार आहेत. ईडब्ल्यूएससाठी (आर्थिक दुर्बल घटक) 3652 आणि एलआयजीसाठी (अल्प उत्पन्न गट) 2800 घरे बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पावर तब्बल 730 कोटी रुपये खर्च होणार असून, पुढील दोन वर्षांत प्रकल्प पूर्ण होईल, असा दावा ‘पीएमआरडीए’ने केला आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून निधी उपलब्ध होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -