Sunday, April 28, 2024
घरमानिनीRelationshipपालकांच्या 'या' चुका मुलांना बनवतात 'हट्टी'

पालकांच्या ‘या’ चुका मुलांना बनवतात ‘हट्टी’

Subscribe

आई बाबा होणं हा प्रत्येक जोडप्यासाठी सुखद अनुभव असतो. कारण बाळाच्या आगमनाने त्यांच आयुष्यचं बदलून जातं. यामुळे प्रेमापोटी त्याचे सगळे लाड पुरवले जातात. आपल्या मुलाला जगातली सगळी सुखं देण्याचा पालकांचा दिवसरात्र प्रयत्न असतो. आईवडील कधीच कोणत्याच गोष्टीसाठी नकार देत नसल्याने मागेल ते मिळवण्याची वृत्ती मुलांमध्ये वाढते. त्यातून ती हट्टी होतात. पण खरं तर येथेच पालक चुकतात. कारण अतिलाड, अनावश्यक अपेक्षा यामुळे मुलं बिघडतात.

Living With Children: Grandparents, hold on to your hats

- Advertisement -

वाढत्या वयानुसार मुलांचा हट्टीपणाही वाढू लागतो. लहान असताना मुलांचे खाऊ किंवा खेळण्यासाठी असलेले हट्ट वेगळे पण मोठे झाल्यावर त्यांचे हट्ट पुरवणे पालकांच्या डोक्याला ताप देणारे ठरते. अशावेळी मग पालक त्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करतात. हे देखील चुकीचे आहे. कारण नकार पचवणे त्यांना शिकवण्यातच आले नसल्याने ते अधिक बंडखोर होतात. तर कधी मुलं इमोशनल कार्ड खेळून हव ते पालकांकडून मिळवतात.अशावेळी मग आईवडीलांना नाईलाजास्तव मुलाचे लाड पुरवावे लागतात.

अनावश्यक अपेक्षा

 

- Advertisement -

अनेक पालक इतर मुलांबरोबर आपल्या मुलांची तुलना करतात. खरं तर तसे करणे चुकीचे असून प्रत्येक मुलं हे दुसऱ्या मुलापेक्षा वेगळे असते. त्यांच्या जडणघडणीतही फऱक असतो. त्यामुळे साहजिकच त्यांच्यात फरक असतो. अशावेळी पालकांनी मुलांची तुलना इतरांशी करणे टाळावे.

How to Discipline Your Stubborn Child - Baby Chick

 

 

खरं तर पालकत्वाबरोबर जबाबदाऱ्याही वाढतात. यामुळे पालकांनी मुलांना वाढवताना सतर्क राहणं गरजेचे आहे. कारण ज्यापद्धतीने मुलांना वाढवलं जातं त्याचा परिणाम त्यांच्या शारिरीकच नाही तर मानसिक विकासावरही होत असतो आणि त्यानुसार ते घडत असतात. कोणतीही गोष्ट अति झाली की त्याचा त्रास होतोच. यामुळे मुलांना वाढवताना पालकांनी या अति चा मोह टाळावा जेणेकरुन पुढे जाऊन पश्चातापाची वेळ येत नाही.

 


हेही वाचा :

मुलांना शिक्षणाबरोबरच शिकवाव्यात ‘या’ 5 गोष्टी

- Advertisment -

Manini