घरमहाराष्ट्रAshok Chavan Resigned : आता अन्य पर्याय पाहिले पाहिजे म्हणून राजीनामा- अशोक चव्हाण

Ashok Chavan Resigned : आता अन्य पर्याय पाहिले पाहिजे म्हणून राजीनामा- अशोक चव्हाण

Subscribe

विधानसभा अध्यक्षांना काँग्रेस सदस्यत्त्वाचा राजीनामा दिल्यानंतर माध्यमांपुढे अशोक चव्हाण यांनी राजीनामा देण्यामागील कारण सांगितले. ते म्हणाले की, वैयक्तिक कोणाबद्दलही माझ्या मनात वेगळी भावना नाही. पुढील राजकीय दिशेबाबत अद्याप मी काहीही निर्णय घेतलेला नाही. याबाबत विचार करून एक-दोन दिवसात माझी भूमिका स्पष्ट करेन असेही अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.

मुंबई : विधानसभा अध्यक्षांना भेटून आज मी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. काँग्रेस कार्यसमिती, पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचाही मी राजीनामा दिला आहे. काँग्रेसमध्ये असताना मी प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले. कोणाबद्दल मी तक्रार करणार नाही. आता मला वाटतं की, मी अन्य पर्याय पाहिले पाहिजेत म्हणून राजीनामा दिला आहे. काँग्रेस सोडणं हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी देत त्यांच्या राजीनाम्या मागील कारण सांगितलं. (Ashok Chavan Resigned Resignation as we have to look at other options Ashok Chavan)

विधानसभा अध्यक्षांना काँग्रेस सदस्यत्त्वाचा राजीनामा दिल्यानंतर माध्यमांपुढे अशोक चव्हाण यांनी राजीनामा देण्यामागील कारण सांगितले. ते म्हणाले की, वैयक्तिक कोणाबद्दलही माझ्या मनात वेगळी भावना नाही. पुढील राजकीय दिशेबाबत अद्याप मी काहीही निर्णय घेतलेला नाही. याबाबत विचार करून एक-दोन दिवसात माझी भूमिका स्पष्ट करेन असेही अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.

- Advertisement -

भाजपामध्ये जाण्याबाबत सस्पेन्स

यावेळी माजी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आले की, तुम्ही भाजपात जाणार का? भाजपा तुम्हाला राज्यसभेवर पाठवणार असल्याची चर्चेत किती तथ्य आहे? यावर अशोक चव्हाण म्हणाले, मला भाजपाची कार्यप्रणाली माहिती नाही. मी अद्याप भाजपात जाण्याचा किंवा इतर कुठल्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतला नाही. येत्या एक ते दोन दिवसांत मी माझी पुढची राजकीय दिशा जाहीर करेन असेही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा : Jitendra Awhad : “तरूणांनो तयार राहा…”, अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर आव्हाडांची बोलकी प्रतिक्रिया

- Advertisement -

प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय

पुढे बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, मी आज काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याशी किंवा आमदाराशी बोललेलो नाही. कोण काय करेन, ते मला माहिती नाही. हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असतो. पण मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, काँग्रेसच्या एकाही आमदाराशी माझं बोलणं झालेलं नाही, असेही यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले. तर मी जन्मापासून आतापर्यंत काँग्रेस पक्षाचे काम केले आहे. तसेच मला कुठल्याही पक्षांतर्गत गोष्टीची वाच्यता करायची नाही. मला कोणाचीही उणीदुणी काढायची नाहीत. तो माझा स्वभाव नाही, असंही चव्हाण म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -