Thursday, May 16, 2024
घरमानिनीRecipeतुम्ही भेसळ असलेल्या पीठाची पोळी तर खातं नाही ना ? असं ओळखा

तुम्ही भेसळ असलेल्या पीठाची पोळी तर खातं नाही ना ? असं ओळखा

Subscribe

नोकरी आणि घर या रोजच्या धावपळीत वेळेअभावी आता पूर्वीसारखं गिरणीमध्ये जाऊन गहू दळूण आणणं जवळ जवळ बंद झालं आहे. त्यामुळे बाजारात मिळणारे तयार गहू पीठ आपण पोळ्यांसाठी वापरतो. पण इतर पदार्थांप्रमाणेच आता या रेडीमेड पीठातही भेसळ होऊ लागली आहे. यामुळे अनेकांना पोटदुखीबरोबरच इतर आजार होण्याचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे रोज आपण भेसळयुक्त पीठाची पोळी तर खात नाही ना हे ओळखता यायला हवं.

- Advertisement -

 

यासाठी एक टेस्ट ट्यूब घ्या. त्यात एक चमचा पीठ आणि हायड्रोक्लोरिक अॅसिड टाका. जर ट्यूबमध्ये पीठाबरोबर दुसराच पदार्थ तरंगताना दिसला तर ते भेसळयुक्त पीठ आहे हे समजून जा.

- Advertisement -

एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा पीठ टाका. जर पाण्याबरोबरच इतर काही कण ग्लासात तरंगताना दिसले तर तुम्ही वापरत असलेल्या पीठात भेसळ आहे हे ओळखा.

तसचे जर तुम्ही बाजारात तयार पीठ घ्यायला गेलात आणि पीठ दिसण्यास स्वच्छ नसेल तर त्यात इतर पदार्थ मिक्स करण्यात आले आहेत हे ओळखा.

 

तसेच एक पोळी खाल्यानंतरही जर पोट भरल्यासारखे वाटत असेल तर पीठात भेसळ असल्याचे ओळखून जा.

जर पोळी खाल्यानंतर पोटात दुखत असेल, अचानक गॅसचा त्रास होत, ढेकर येत असेल तरीही पीठात इतर पदार्थ मिक्स केल्याचे ओळखा.

- Advertisment -

Manini