घरमहाराष्ट्रनाशिकशरद पवारांवर वादग्रस्त ट्वीट करणाऱ्या निखिल भामरेवर भाजपचे विशेष प्रेम, महत्त्वाच्या पदी...

शरद पवारांवर वादग्रस्त ट्वीट करणाऱ्या निखिल भामरेवर भाजपचे विशेष प्रेम, महत्त्वाच्या पदी नियुक्ती

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त ट्वीट करणाऱ्या निखिल भामरे या नाशिकमधील तरुणाला भाजपकडून महत्त्वाचे पद देण्यात आले आहे.

नाशिक : ‘वेळ आली आहे, बारामतीच्या गांधीसाठी, बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची. #बाराचा_काका_माफी_माग’ असे ट्वीट करत निखिल भामरे या तरुणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त ट्वीट केले होते. ज्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण आता याच तरुणाकडे भाजपने आयटी सेल या पदाशी निगडीत महत्त्वाचे पद देत त्याला पक्षाचा पदाधिकारी म्हणून नेमले आहे. निखिल भामरे याला भाजपकडून आयटी सेलमध्ये सहसंयोजक पदावर नियुक्त करण्यात आले आहे. (BJP gave important post to Nikhil Bhamre who tweeted controversially on Sharad Pawar)

हेही वाचा – औरंगजेबाचे पोस्टर्स हा काही योगायोग नाही, हा प्रयोग आहे; फडणवीसांचे विरोधकांवर शरसंधान

- Advertisement -

निखिल भामरे याने काही महिन्यांपूर्वी शरद पवार यांच्याविरोधात सोशल मीडियावर वादग्रस्त ट्वीट केले होते. निखिल हा नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे राहणारा असून तो बी. फार्मसीचे शिक्षण घेत आहे. परंतु ज्यावेळी त्याने हे ट्वीट केले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली होती. तसेच त्याच्याविरोधात वेगवेगळ्या ठिकाणी 7 गुन्हे दाखल करण्यात आले होते. ज्यानंतर त्याला 50 दिवस तुरुंगात ठेवण्यात आले होते.

यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत निखिल भामरेची तुरुंगातून सुटका केली होती. यासाठी त्याने फडणवीस यांचे आभार मानले होते. याबाबतचे ट्वीट करत निखिलने लिहिले होते की, “जे कठीण काळात भक्कमपणे पाठीशी उभे राहीले, त्या देवेंद्र फडणवीस यांचे खूप खूप आभार. आपण केलेल्या मदतीचा मी सदैव ऋणी राहील. पुन्हा आलोय त्या प्रत्येकाचे आभार मानायला ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या मला व माझ्या कुटूंबाला कठीण काळात मदत केली. ज्यांच्या मुळे आज मला पूर्वीपेक्षा जास्त मजबूत झाल्यासारखे वाटते. दिंडोरी (नाशिक) पासून ते ठाणे, पुण्यापासून ते वर्तकनगर ते मावळ पर्यंत ते शेवटी मुंबई उच्च न्यायालयात माझ्या या केस मधे कोर्टात माझी बाजू भक्कमपणे मांडत या केसला लढ्याचं रूप देणाऱ्या लिगल टिमच्या सर्व सदस्यांचे मनापासून धन्यवाद,”

- Advertisement -

त्यामुळे आता निखिलने पवारांच्या विरोधात केलेल्या ट्वीटबद्दल हे भाजपकडून बक्षीस देण्यात आले आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. भाजपकडून नुकतीच नवीन पदाधिकाऱ्यांची यादी जाहिर करण्यात आली आहे. यामध्ये निखिलचे नाव देखील आहे. तर ज्यावेळी निखिलने महाविकास आघाडीच्या काळात शरद पवार यांच्याविरोधात पोस्ट केली होती, त्यावेळी सुद्धा त्याला पक्षाकडून पद देण्याबाबत बोलण्यात आले होते. परंतु तेव्हा त्याच्याकडून नकार देण्यात आला होता. तर दोन दिवसांपूर्वी अकोला येथील एका गुंडाला भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. या प्रवेश सोहळ्याला अनेक नागरिक उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -