मनसुख हिरेन हत्येचा कट, सचिन वाझेंचीही बैठकीला हजेरी- NIA

मनसुख हिरेन हत्येचा कट, सचिन वाझेंचीही बैठकीला हजेरी- NIA

मुकेश अंबानी यांच्या घराजवळील स्फोटकांनी भरलेल्या गाडीची आणि गाडी मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी एनआयए तपास करत आहे. या प्रकरणी एनआयए निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांना ताब्यात घेत चौकशी करत आहे. या चौकशीदरम्यान मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कटासाठी घेण्यात आलेल्या बैठकीत वाझे सहभागी असल्याची महत्त्वपूर्ण माहिती एनआयएने न्यायालयात सादर केली.

ATS ला धक्का! मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास थांबवून कागदपत्रे NIA कडे द्या – ठाणे सत्र न्यायालय

एनआयएने विशेष न्यायालयात मनसुख हिरने हत्ये प्रकरणी महत्त्वाचा खुलासा केला. मनसुख हिरेन यांच्या हत्येसाठी बैठक घेत कट रचण्यात आला. या बैठकीत सचिन वाझेंसह विनायक शिंदेही सहभागी होते. या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपींशी संपर्क साधण्यासाठी सचिन वाझे यांनी स्वत:च्या मोबाईचा वापर केला. परंतु यात एनआयएने कट रचणाऱ्या आरोपींची नावे सांगितली नाही. मात्र एनआयएची तपास यंत्रणा मनसुख हिरेन यांच्या हत्येमागील कट आणि उद्देशापर्यंत पोहचली असल्याची माहिती एनआयएच्या वकिलांनी न्यायालयात दिली.

मनसुख हिरेन हत्याकांडात ११ जणांचा समावेश

यावर आरोपी विनायक शिंदे यांचा या गुन्ह्यामध्ये कसलाही सहभाग नाही, तसेच सीम कार्ड देण्याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारे आरोपीला या प्रकरणात जबाबदार ठरवले गेले नाही असे शिंदेंचे वकील गौतम जैन यांनी न्यायालयात सांगितले. शिंदे ९ दिवसांपासून तपास यंत्रणांच्या कोठडीत आहेत, परंतु त्यांच्या कोठडीत आणखी वाढ करण्याची गरज नसल्याचा युक्तिवादही जैन यांनी केला. तर दुसरीकडे नरेश गोर यांचे वकील अफताब डायमंडवाले यांनीही आपली बाजू मांडली. यावेळी ते म्हणाले, नरेश गोरे यांचा या प्रकरणात फक्त सीमकार्ड देण्यापर्यंतच सहभाग आहे. त्यामुळे गोरे यांना खोट्या प्रकरणात अडकवले जात असल्याचा दावा वकील डायमंडवाले यांनी केला आहे. या सुनावणीअंती विशेष न्यायालयाचे न्यायाधीश पी.आर.सीत्रे यांनी आरोपी विनायक शिंदे आणि नरेश गोर यांच्या एनआयए कोठडी ७ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.


हेही वाचा- मनसुख हिरेन हत्याकांडात मुख्य आरोपी सचिन वाझेच

 

First Published on: March 31, 2021 12:19 PM
Exit mobile version