घरक्राइमMumbai Police : कुवेतमधून बोट चोरली, समुद्रमार्गे मुंबईत आले; पोलिसांकडून तिघांची चौकशी...

Mumbai Police : कुवेतमधून बोट चोरली, समुद्रमार्गे मुंबईत आले; पोलिसांकडून तिघांची चौकशी सुरू

Subscribe

मुंबई : मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया याठिकाणी अरबी समुद्रातून एक संशयास्पद बोट दाखल झाली आहे. मुंबई पोलिसांच्या गस्ती पथकाने या बोटीला गेटवेवर थांबवून त्यातून प्रवास करणाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे. सध्या काहीही संशयास्पद आढळले नाही. या बोटीतून 3 भारतीय प्रवास करत होते, जे तामिळनाडूचे रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. (Mumbai Police Boat stolen from Kuwait came to Mumbai by sea Police are investigating the trio)

हेही वाचा – Mumbai News : “मिठी” नदीच्या विकासावर हजारो कोटी खर्च मात्र काम “संपेचिना”

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्याकुमारी जिल्ह्यातील तीन तमिळ मच्छिमार कुलाबा पोलीस स्टेशनच्या ताब्यात आहेत. अँटोनी, एनडिसो डिटो आणि विजय अँटोनी अशी या तिघांची नावे आहेत. या प्रकरणी अद्याप एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. थकबाकी व पगार न दिल्यामुळे मालकाची बोट चोरल्याचे मच्छिमारांनी चौकशीत सांगितले. त्यांनी पोलिसांना असेही सांगितले की, ते एका मासेमारी करणाऱ्या कंपनीत काम करत होते. त्याठिकाणी त्यांचा मालक त्यांचे शोषण करत होते. नियमित मारहाण करत होता आणि वेळेवर जेवण देखील देत नव्हता. तसेच पासपोर्टही काढून घेतले होते. त्यामुळे मालकाची बोट चोरून भारतात येण्याचा आम्ही निर्णय घेतला.

12 दिवसांपासून न थांबता प्रवास

एका अधिकाऱ्याने सांगितले की, ते 12 दिवसांपासून न थांबता प्रवास करत होते. आम्ही त्यांना पकडले तेव्हा ते गेल्या तीन ते चार दिवसांपासून जेवले नव्हते. कारण त्यांनी त्यांच्यासोबत आणलेले जिन्नस संपले होते. आम्हाला त्यांच्याकडे काही संशयास्पद आढळले नाही. मात्र त्यांची बोट ताज हॉटेलजवळ सुरक्षित ठेवण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – MNS : हा ‘वळसा’ महाराष्ट्राला ‘पटेल’ का? मनसेचा अजित पवारांना टोला

कुलाबा पोलिसांकडून अनेक प्रश्न उपस्थित 

कुलाबा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सुदैवाने त्या मच्छिमारांकडे शस्त्रे आणि स्फोटक साहित्य नव्हते. जर असती तर 26/11 च्या हल्ल्याची पुनरावृत्ती झाली असती? अशा सुरक्षेतील त्रुटींना जबाबदार कोण? मुंबईच्या दिशेने एवढा लांबचा प्रवास करणारी बोट कोणाच्या लक्षात का आली नाही? सध्या ही बोट गेट वे ऑफ इंडियावर सुरक्षितपणे उभी आहे. कुवैती बोट गेटवे ऑफ इंडिया याठिकाणी अरबी समुद्रातून भारतीय किनाऱ्यावर कशी पोहोचली? असे प्रश्न कुलाबा पोलिसांकडून उपस्थित करण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -