घरमहाराष्ट्रRohit Pawar : "जखमी वाघ अधिक धोकादायक", रोहित पवारांचा राष्ट्रवादी आणि भाजपाला इशारा

Rohit Pawar : “जखमी वाघ अधिक धोकादायक”, रोहित पवारांचा राष्ट्रवादी आणि भाजपाला इशारा

Subscribe

निवडणूक आयोगाच निकाल आपल्या बाजूने करून घेण्याची ताकद असेल, तर मग मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाज या सर्व समाजाला न्याय देण्यासाठी 50 टक्क्यांच्या पुढे जाऊन आरक्षण देण्याची धमक या सरकारकडे नाही का? असा सवालही शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे.

मुंबई : जखमी वाघ अधिक धोकादायक असतो. हे फुटीरगट आणि भाजपाने जाणून घेतले पाहिजे, असा इशारा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दिला आहे. असंवैधानिक पद्धतीने फुटीरगटाला पक्ष आणि चिन्ह दिले असले, तरी आमच्याकडे ज्या बापाने तो पक्ष सुरू केला, असा बापमाणूस आमच्याबरोबर आहे, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी निवडणूक आयोगाच्या निकालावर दिली आहे.

रोहित पवार म्हणाले, “2000 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्माण झाला होता. तेव्हा कोणालाही आमचे चिन्ह काय आहे, हे कोणाला माहिती नव्हते. पण शरद पवार कोण आहेत आणि त्यांनी काय केले हे सर्वांना माहिती होते. ज्यामुळे हे फुटीरगटातले नेते निवडून आले. त्यामुळे आमचा विश्वास शरद पवार, त्यांच्या कार्य आमि राज्याच्या जनतेवर आहे. जखमी वाघ हा घातक असतो, हे कुठे तरी फुटीरगट आणि भाजपाने जाणून घेतले पाहिजे”, असा इशाराही रोहित पवारांनी दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Anil Deshmukh On BJP : सर्वाधिक नाराज आमदार भाजपाचे; अनेक आमच्या संपर्कात – अनिल देशमुख

निवडणूक आयोगाच्या निकालावर टीका करताना रोहित पवार म्हणाले, “निवडणूक आयोग हे भाजपाचे राजकीय विंग झाली आहे, असे म्हणावे लागेल. निवडणूक आयोगाच्या प्रमुखाची नियुक्ती करण्याचा अधिकार सत्तेतील लोकांना आहे. त्यामुळे अशा निवडणूक आयोगाकडून आपण काय अपेक्षित करणार होतो? असंवैधानिक पद्धतीने फुटीरगटाला पक्ष आणि चिन्ह दिले असले, तरी आमच्याकडे ज्या बापाने तो पक्ष सुरू केला, असा बापमाणूस आमच्याबरोबर आहे. त्यामुळे आम्हाला कुठेही टेंशन वाटत नाही. फुटीरगट असेल किंवा भाजपा महाराष्ट्र असेल त्यांच्याकडे पक्ष कुटुंब फोडण्याची ऐवढी ताकद असेल, निवडणूक आयोगाच निकाल आपल्या बाजूने करून घेण्याची ताकद असेल, तर मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाज या सर्व समाजाला न्याय देण्यासाठी 50 टक्क्यांच्या पुढे जाऊन आरक्षण देण्याची धमक या सरकारकडे नाही का? असा सवालही रोहित पवार यांनी केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Sharad Pawar Group : …हे असेल शरद पवार गटाचं नवं नाव आणि चिन्ह; सूत्रांनी दिली माहिती

आम्ही लढणार आणि जिंकणार

सरकारवर टीका करताना रोहित पवार म्हणाले, “जे प्रकल्प गुजरातला चाललेत, यामुळे राज्यात बेरोजगार युवकांना अडचणीत येते ते थांबवण्याची आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याची धमक राज्य सरकारकडे नाही का? भाजपाची केंद्रातील जी महाशक्ती आहे, त्याचा वापर फक्त स्वहितासाठी आणि स्वार्थासाठीकरून घेण्यासाठी करता. पण महाराष्ट्राचे हित जपण्यासाठी करत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही लढणार आणि जिंकणार, आम्ही न्यायालयात जाऊ”, असेही रोहित पवारांनी सांगितले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -