हिंदू धर्मात भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी देशभरात प्रामुख्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये गणेश मूर्तींची स्थापना केली जाते. संपूर्ण राज्यभरात 10 दिवस गणेशोत्सवाचा जल्लोष असतो. प्रत्येक ठिकाणी गणपतीची पूजा-आराधना केली जाते. सगळीकडे उत्साह आणि चैतन्याचं वातावरण असतं. या वर्षी 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे. परंतु आता फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशातील काही राज्यांमध्ये देखील गणेशोत्सव साजरा केला जातो. यामध्ये दिल्ली, कोलकत्ता, गोवा, गुजरात या राज्यांचा सहभाग आहे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -