उमरान भारतीय संघासाठी दीर्घकाळ खेळेल; सौरव गांगुलीकडून मलिकचे कौतुक

उमरान भारतीय संघासाठी दीर्घकाळ खेळेल; सौरव गांगुलीकडून मलिकचे कौतुक

इंडियन प्रिमीयर लीगनंतर (आयपीएल) दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) संघ भारत दौरा करणार आहे. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात 9 जून पासून पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. आयपीएलनंतर (IPL 2022) दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या सामन्यात भारतीय नियामक मंडळ (बीसीसीआय) युवा खेळाडूंना स्थान देईल असे बोलले जात होते. त्यानुसार बीसीसीआयने (BCCI) आयपीएल खेळणाऱ्या अनेक युवा खेळाडूंना या दौऱ्यात संधी दिली आहे. यामध्ये यंदाच्या आयपीएलमधील सनरायजर्स हैदराबादचा सर्वाधिक वेगवान गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik) याचे नाव असून, त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. उमरानला भारतीय संघात स्थान मिळाल्यानंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) याने मोठे वक्तव्य केले आहे. “मला खात्री आहे की उमरान भारतीय संघासाठी दीर्घकाळ खेळेल. मात्र, मलिकचं भविष्य खुद्द मलिकच्याच हाती आहे”, असे वक्तव्य गांगुलीने केले आहे.

“मला खात्री आहे की, उमरान भारतीय संघासाठी दीर्घकाळ खेळेल. परंतु, उमरान मलिकचे भविष्य खुद्द त्याच्याच हाती आहे. या हंगामात मुंबई इंडियन्सचा टिळक वर्मा, गुजरात टायटन्सचा (Gujarat Tiatans) राहुल तेवतिया यांनी चमकदार कामगिरी केली आहे. या हंगामात उमरान मलिक, मोहसीन खान, अर्शदीप सिंह आणि आवेश खान सारखे उगवते गोलंदाज आम्ही पाहिले. या लीगमुळे युवा खेळाडूंना चांगली संधी मिळते”, असे सौरव गांगुलीने म्हटले.

हेही वाचा – IPL 2022: “हार्दिक पांड्या नाव घेतल्यावर बातमी पण विकली जाते”; हार्दिक पांड्याचे टीकाकारांना उत्तर

आयपीएलच्या 14 सामन्यात उमरान मलिकने 22 विकेट घेतल्या आहेत. मलिकची इकोनॉमी 9.03 इतकी तर, स्ट्राइक रेट 13.57 इतका होता. मलिकने सातत्याने ताशी 150 किमी वेगाने गोलंदाजी केली. विशेष म्हणजे गोलंदाजी करताना त्याने त्याच्याच गोलंदाजीचा विक्रम मोडला होता. दरम्यान, त्याच्या गोलंदाजी सर्व क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चा रंगली आहे. त्यानंतर त्याच्या गोलंदाजीची बीसीसीआयकडून दखल घेतली असून, त्याला संघात स्थान देण्यात आले. त्यामुळे आता उमरान दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या मालिकेत किती विकेट्स घेतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा – IPL 2022 : उमरान मलिकने मोडला स्वत:चाच विक्रम; आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात वेगवान चेंडू फेकला

दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या भारतीय संघाचे नेतृत्व केएल राहुलकडे सोपवण्यात आले आहे. तसेच, संघात ऑलराऊंडर हार्दिक पांड्याचा समावेश करण्यात आला असून, उम्रान मलिक आणि अर्शदीप सिंह यांनाही संघात संधी देण्यात आली आहे.

भारतीय संघ –

केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उम्रान मलिक यांचा समावेश आहे.

हेही वाचा – विक्रम मोडण्यासाठी उमरानने आपली हाडे मोडू नयेत : शोएब अख्तर

भारतीय क्रिकेट संघाच वेळापत्रक


हेही वाचा – Gujarat Titans IPL 2022: राजस्थानवर मात करत गुजरात टायटन्सची अंतिम फेरीत धडक, संघाकडून नवा रेकॉर्ड

First Published on: May 25, 2022 7:48 PM
Exit mobile version