भारत-दक्षिण आफ्रिका टी-20 सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा

Indian team for India-South Africa T20 match announced
Indian team for India-South Africa T20 match announced

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात 9 जून पासून पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संघाची घोषणा केली आहे. या संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे. संघात ऑलराऊंडर हार्दिक पांड्याचा समावेश करण्यात आला आहे. तर उम्रान मलिक आणि अर्शदीप सिंह यांना टीम इंडियाच्या टी20 संघात पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे.

ही असेल टीम –

आता आयपीएलचा हंगाम सुरू आहे. आयपीएलची फायनल 29 मे रोजी पार पडणार आहे. यानंतर लगेच भारतीय खेळाडू दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळणार आहेत. दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार असून यावेळी 5 टी20 सामने खेळवले जाणार आहेत. या संघात केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उम्रान मलिक यांचा समावेश आहे.

येथे होणार सामने –

दक्षिण आफ्रिके विरुद्धचे सामने 9 जूनला पहिला सामना दिल्लीच्या अरुन जेटली स्टेडीयम वर होणार आहे. यानंतर दुसरा सामना 12 जनू बाराबती स्टेडियम कट्टक, तिसरा सामना 14 जून डॉ एस वाय राजशेखर रेड्डी एसीए व्हिडीसीए क्रिकेट स्टेडियम विशाखापट्टणम,चौथा सामना 17 जूनला सौराष्ट्र क्रिकेट असोसीएशन स्टेडियम राजकोट, पाचवा सामना 19 जून एम. चिन्नस्वामी स्टेडियम बंगळुरु येथे होणार आहे.