Monday, April 29, 2024
घरमानिनीखुसखुशीत मैद्याच्या गोड शंकरपाळ्या तयार करण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

खुसखुशीत मैद्याच्या गोड शंकरपाळ्या तयार करण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Subscribe

उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट, दिव्यांची आरास, फराळाचे ताट, आतिषबाजी, आनंदाची लाट, नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट. दिवाळी म्हटलं कि 15 दिवस आधीच फराळाची सुरूवात होते. प्रत्येक घरात फराळ तयार करण्याची लगबग चालू असते. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात दिवाळीच्या पदार्थाची यादीच तयार असते. ती यादी संपता संपत नाही. बऱ्याच वेळा हे पदार्थ बनवताना वेळही कमी पडतो. तर कधी कधी पदार्थांचं प्रमाण चुकलं की पदार्थ बिघडतो. म्हणून दिवाळी फराळ्याच्या स्पेशल रेसिपी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत. यावर्षीही दिवाळीचा फराळ घरीच करा. चला तर पाहूया दिवाळीच्या फराळासाठी सोप्या रेसिपी आणि काही खास टिप्स.

दिवाळीतला ठरलेला पदार्थ म्हणजे शंकरपाळी. खुसखुशीत मैद्याच्या गोड शंकरपाळी सर्वांचाच आवडता पदार्थ आहे.
शंकरपाळ्या सर्वांचाच जवळचा आणि आवडीचा पदार्थ आहे

- Advertisement -

साहित्य :

  • 1 किलो मैदा
  • 1/5 किलो साखर
  • 1/2 किलो तूप
  • 1/2 लिटर दूध

कृती :

- Advertisement -

  • सर्वप्रथम कढईत तूप गरम करा.
  • त्यात दूध ओता आणि साखर घालून विरघळून घ्या.
  • त्यात मैदा घालून छान पिठ मळून घ्या. पिठाची हलक्या हाताने मोठी पोळी लाटून घ्या.
  • सुरी किंवा चरकीने शंकरपाळी तुम्हाला हव्या त्या आकारात कापून घ्या.
  • शंकरपाळी तेलात मंद आचेवर तांबूस रंगावर तळा.
  • खुसखुशीत शंकरपाळ्या तयार.

 


हेही वाचा :

सोप्या पद्धतीने झटपट तयार करा चिवडा

- Advertisment -

Manini