घरमहाराष्ट्र...म्हणून निवडणुकीतून भाजपाने माघार घेतली, किशोरी पेडणेकरांनी सांगितली आतली बात

…म्हणून निवडणुकीतून भाजपाने माघार घेतली, किशोरी पेडणेकरांनी सांगितली आतली बात

Subscribe

मुंबई- अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपाने माघार घेतली आहे. महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरेचा दाखला घेत भाजपा माघार घेत असल्याचं सांगितलं जातंय. मात्र, त्यांनी उमेदवारी मागे घेण्याचं वेगळंच कारण असल्याचा गौप्यस्फोट मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी केला आहे.

हेही वाचा मोठी बातमी! अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपाची माघार

- Advertisement -

किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, मुरजी पटेल हे खोटं प्रमाणपत्र दिल्याने बाद झालेले उमेदवार होते. त्यामुळे सर्वांना ती कल्पना आली. हे उशिरा आलेलं शहाणपण आहे,” असा आरोप किशोरी पेडणेकरांनी केला आहे. त्या पुढे म्हणाल्या की, “आमच्या पक्षप्रमुखांनी कायमच आपली परंपरा, संस्कृती आम्ही पाळत आलो असल्याचं सांगितलं आहे. दिवंगत व्यक्तीच्या मागे मुलगा, मुलगी, पत्नी कोणीही असलं तरी आपण त्यास मार्ग मोकळा करून देतो. पण यावेळी भाजपाने फार आठमुठेपणा केला. काळजाववर दगड ठेवून त्यांनी हा निर्णय घेतला आहे.”

“आमचा उमेदवार बिनविरोध निवडून येणार याचा आनंद आहे. पण भाजपाने काळजावर दगड ठेवून हा निर्णय घेतला आहे. लटकेंना ज्याप्रकारे राजीनामा देताना लटकवण्यात आलं होतं, ते लोक विसरु शकत नव्हते. आजच पत्र का दिलं? एक महिनाआधी का दिलं नाही? हा संपूर्ण वाद टाळता आला असता. ऋतुजा लटके यांना मानसिक त्रास झाल तो कसा भरुन काढणार? असे विविध सवालही किशोरी पेडणेकर यांनी विचारले आहेत.

- Advertisement -

निवडणुकीतून माघार

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. तसंच, शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही पत्र लिहून बिनविरोध निवडणुकीची विनंती केली होती. बिनविरोध निवडणुकीची मागणी वाढल्याने भाजपाच्या नेत्यांमध्ये काल मध्यरात्री बैठक पार पडली. ही निवडणूक व्हावी अशी स्थानिक नेत्यांची मागणी होती. परंतु, अंतिम निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आला. काहीच वेळापूर्वी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपा माघार घेत असल्याची घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची तारीख आहे. मुरजी पटेलसह इतर उमेदवारांनीही आज अर्ज मागे घेतल्यास ऋतुजा लटके यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा होईल.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -