Monday, April 29, 2024
घरमानिनीKitchenRecipe : बच्चेकंपनीसाठी झटपट बनवा गूळाचा पराठा

Recipe : बच्चेकंपनीसाठी झटपट बनवा गूळाचा पराठा

Subscribe

आपण सगळ्या प्रकारचे पराठे घरात आवडीने बनतो. पण जर का तुम्ही गुळाचा पराठा कधी खाल्ला नसेल तर नक्की खा. तसेच गुळाचा पराठा हा शरीरासाठी खूप चांगला असतो. गुळामध्ये असलेल आयरन आपल्या हेल्दी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. लहान मुलांना गुळाचा पराठा नक्की आवडेल. तसेच त्यांचा आरोग्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. जाणून घ्या गूळाचा पराठ्याला लागणारे साहित्य आणि कृती…..

साहित्य

  • गव्हाचे पीठ- 2 वाट्या
  • गूळ- 3/4 कप (बारीक तुकडे)
  • बदाम 5-6
  • तूप 2-3 चमचे
  • वेलची पूड
  • मीठ- 1/2 टीस्पून

गोभी पराठा बनाने की विध‍ि Gobi Paratha Recipe in Hindi

कृती

  • एका भांड्यात गव्हाचे पीठ घ्या. त्यात एक चमचा तूप आणि चिमूटभर मीठ घालून पीठ मळून घ्या.
  • पीठ झाकून ठेवा आणि यानंतर 20 मिनिटे पीठ तसेच ठेवून द्या.
  • दुसर्‍या भांड्यात गूळ, वेलची पूड, बदाम आणि मीठ घालून मिक्स करा.
  • यानंतर पिठाचा गोळा बनवा. त्यात गुळाचे मिश्रण भरा.
  • पीठ सर्व बाजूंनी चांगले मळून घ्या. जेणेकरून पिठाचा रोल करताना ते फाटू नये. तसेच पराठा हलक्या हातांनी लाटून घ्यावा.
  • आता तव्यावर पराठा ठेवा.  एका बाजूने हलका सोनेरी तपकिरी झाला की पराठा फिरवा आणि आवडीनुसार पराठा देशी तूप किंवा रिफाइंड तुपाने भाजून घ्या.
  • पराठ्या सोबत लोणची, चटणी किंवा मग दह्यासोबत देखील तुम्ही पराठ्याचा आस्वाद घेऊ शकता.

हेही वाचा : Soup Recipe: काळ्या हरभऱ्याचे हेल्दी सूप

- Advertisment -

Manini