Saturday, April 27, 2024
घरमानिनीReligiousVastu Tips : सतत आजारपण सुरु आहे? 'हे' वास्तुदोष करा दूर

Vastu Tips : सतत आजारपण सुरु आहे? ‘हे’ वास्तुदोष करा दूर

Subscribe

सुंदर आयुष्य जगण्यासाठी पैसा, करिअर, नात्यांसोबत आपलं आरोग्य सुदृढ असणं देखील गरजेचं आहे. शिवाय शारीरिक, मानसिक आणि सामाजिक रुपाने सक्षम असणं सुदृढ असण्याचं लक्षण आहे. अलीकडच्या बदलत्या लाईफस्टाईल आणि खाण्या-पिण्यामुळे अनेकांना विविध प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागतो. शारीरिक आणि मानसिक रुपाने फिट राहण्यासाठी आपण अनेक उपचार घेतो. पण, कधी-कधी या सर्व उपचारांचा काहीच परिणाम आपल्या आरोग्यावर होत नाही. अशावेळी आपल्या राहत्या घरात वास्तुदोष असल्याचं देखील म्हटलं जातं.

Easy Ways to Make Your Home Beautiful and Happy -

- Advertisement -

कधी-कधी घरात मोठ्या प्रमाणात वास्तू दोष असल्यामुळे देखील अनेकांना आजारांचा सामना करावा लागतो. घरातील प्रत्येक दिशेचा तसेच घरातील प्रत्येक वस्तूचा आपल्या आरोग्य, सुख-समृद्धी, आर्थिक परिस्थितीशी संबंध असतो.

‘या’ गोष्टींमुळे घरामध्ये निर्माण होऊ शकतो वास्तुदोष

A Mumbai home that displays an eclectic mix of traditional and modern |  Architectural Digest India

- Advertisement -
  • स्वयंपाक घराची दिशा नेहमी आग्नेय कोपऱ्यात असावी. तसेच स्वयंपाक घरात कधीही आग आणि पाणी एकत्र ठेऊ नये. असं केल्यास घरातील सदस्यांना पोटासंबंधी आजार निर्माण होतात.
  • स्वयंपाक घरात रात्री खरकटी भांडी ठेऊ नये.
  • स्वयंपाक घरात जेवण बनवताना चेहरा नेहमी पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावा.
  • रात्री झोपताना तुमचं डोकं नेहमी उत्तर दिशेला आणि पाय दक्षिणेला असल्यास डोकेदुखी, निद्रानाश अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे झोपताना डोकं दक्षिणेला किंवा पूर्वेला असावं आणि पाय उत्तरेला किंवा पश्चिमेला असावे.
  • गर्भवती स्त्रियांनी कधीही पूर्वोत्तर दिशेला झोपू नये, यामुळे गर्भाशयासंबंधित समस्या निर्माण होतात.
  • घरामध्ये जुन्या, वापरात नसलेल्या वस्तू ठेऊ नये.
  • घराचे प्रवेश दार स्वच्छ आणि सुंदर ठेवावे.
  • घरात रोज सकाळ-संध्याकाळ कापूर, धूप-दीप लावावे.
  • घरात दररोज देवाच्या मंत्राचे, स्तोत्रांचे पठण करावे.

 


हेही वाचा :

हातात पैसा टिकत नाही? ‘या’ उपायांनी होईल चमत्कार

- Advertisment -

Manini