Sunday, April 21, 2024
घरमानिनीKitchenफ्रीजमध्ये ठेवूनही कारली पिवळी पडतात? वापरा 'या' टिप्स

फ्रीजमध्ये ठेवूनही कारली पिवळी पडतात? वापरा ‘या’ टिप्स

Subscribe

कामाच्या गडबडीत प्रत्येकवेळी बाजारात जाऊन ताजी भाजी विकत घेणे अनेकांना जमत नाही. त्यामुळे बहुतांश लोक आठवडाभराचा भाजीपाला विकत आणून फ्रिजमध्ये ठेवतात. रोज दिवसाला एक अशाप्रकारे भाजी केली जाते. हल्ली भाजी ताजी राहावी आणि खराब होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये साठवली जाते. अनेक भाज्या फ्रिजमध्ये चांगल्या राहतात . मात्र अनेकदा फ्रीजमध्ये भाजी ठेवूनही ती सुकून जाते किंवा खराब होते. कारल्याचेही तसेच होते कारले आठवडाभर फ्रीजमध्ये राहिल्यास ते पिवळे पडण्यास सुरुवात होते. त्यामुळं ही कारले फेकून द्यावी लागतात. अशावेळी कारली दीर्घकाळ ताजी ठेवण्यासाठी काय करावे, हे जाणून घ्या.

आधीच कापून ठेवू नका

अनेक वेळा वेळ वाचवण्यासाठी आपण भाज्या फ्रिजमध्ये कापून ठेवतो. पण असे केल्याने भाज्या लवकर खराब होऊ शकतात. शिवाय त्यामुळे भाज्यातील पोषक घटक नष्ट होतात, त्यामुळे भाज्या तयार करतानाच कापून घ्या.

- Advertisement -

प्लास्टिकची पिशवी वापरु नका

भाज्या दीर्घकाळासाठी साठवायच्या आहेत तर सगळ्यात पहिली चुक तुम्ही करता ते म्हणजे. बाजारातून भाज्या आणल्यानंतर त्या प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून मग फ्रीजमध्ये ठेवता. प्लास्टिकच्या पिशवीत भाज्या ठेवल्याने त्यातील ओलावा कायम राहतो आणि भाज्या खराब होतात. त्याऐवजी भाज्या कागदाच्या पिशवीत ठेवाव्यात. कागदाची पिशवी भाज्यांमधील ओलावा शोषून घेण्यास मदत करतात, त्यामुळं भाज्या दीर्घकाळ टिकतात. कारलेदेखील कागदाच्या पिशवीत ठेवल्यास आठवडाभर व्यवस्थित टिकून राहतात.

झिपलॉक बॅगचा वापर करा

बाजारातून कारले आणल्यानंतर ते आधी स्वच्छ धुवून घ्यावी. नंतर पूर्णपणे कोरडे झाल्यानंतर फ्रीजमध्ये स्टोअर करावे, यामुळं कारले आठवडाभर फ्रेश राहते.
कारले स्वच्छ धुवून कोरडे केल्यानंतर ते एका झिपलॉक बॅगमध्ये ठेवावे. कारण भाजीभोवती निर्माण झालेला ओलावा नियंत्रित करण्याची क्षमता या झिपलॉक बॅगमध्ये असते. तसंच, फ्रीजमध्ये कारले ठेवताना 50 अंश सेल्सिअसच्या खाली जास्त काळ साठवू नका. नाहीतर कारली लवकर सडून जातील.

- Advertisement -

आधीच कापून ठेवू नका

ऑफिसला जाणाऱ्या महिला वेळ वाचावा म्हणून भाज्या आधीच कापून ठेवतात. पण कारल्याच्या बाबतीत असं चुकूनही करु नका. कारले कापून झाल्यानंतर ते लवकर खराब होतात. तसंच, त्यातील पोषक तत्वेदेखील नष्ट होतात. कारण उष्णता, ऑक्सिजन आणि प्रकाश याचा थेट संपर्क होतो त्यामुळं कारले लवकर खराब होतात. भाजी करत असतानाच कारले कापून घ्या. जेणेकरुन त्याची पौषकतत्वेदेखील तुम्हाला मिळतील.

कारल्याचा कडवटपणा दूर करण्यासाठी

कारली कडू असल्याने ती अनेकांना आवडत नाहीत. पण कारल्याचा कडवटपणा दूर करण्यासाठीही काही टिप्स आहेत. कारल्याची कवडटपणा हा त्यांच्या बियांमध्ये अधिक असतो. त्यामुळं भाजी करताना कारल्याच्या बिया काढाव्यात आणि मग शिजवावा.

- Advertisment -

Manini