आजकाल सगळ्याच ऋतूमध्ये सर्दी आणि पोटाशी संबंधित समस्या वाढू लागल्या आहेत. पण आपल्या आरोग्याशी संबंधित प्रत्येक समस्येचे समाधान आपल्या स्वयंपाकघरात दडलेले असते. सर्दी-खोकला असो, पोटाशी संबंधित कोणतीही समस्या असो किंवा इतर काहीही असो, या सर्वांवर आपले घरगुती उपाय रामबाण उपाय आहेत.
घरी बनवा तुळशी आणि आल्याचा काढा-
- Advertisement -
साहित्य-
- तुळशी – काही पाने
- आले – एक लहान तुकडा
- लवंगा – 2-3
- हिरवी वेलची – 2-3
- काळी मिरी – 5-6
- पाणी – 2 ग्लास
- Advertisement -
कृती-
- पाणी गरम करा.
- सर्व काही गरम पाण्यात घाला.
- 7-8 मिनिटे उकळू द्या.
- चांगलं उकळल्यावर गाळून घ्या.
- तुम्ही त्यात चिमूटभर हळद आणि दालचिनी देखील घालू शकता.
- ते गरम पाणी सतत थोड्या वेळाने प्या.
तुळशी आणि आल्याच्या काढ्याचे ‘हे’ आहेत फायदे-
- सर्दी आणि खोकल्यासाठी खूप फायदेशीर आहे.
- छातीतील रक्तसंचय दूर करते.
- शरीरातील सर्व हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकतो.
- अन्न पचन सुधारते.
- रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
- अनेक प्रकारच्या संसर्गापासून शरीराचे रक्षण करते.
हेही वाचा :