घरमहाराष्ट्रहे सरकार काही तासांचं, सगळ्यांचं मोजमाप करु; आदित्य ठाकरेंचा घणाघात

हे सरकार काही तासांचं, सगळ्यांचं मोजमाप करु; आदित्य ठाकरेंचा घणाघात

Subscribe

हे सरकार काही तासांचेच आहे. आम्ही सत्तेत आल्यावर सगळ्याचं मोजमाप करु, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर घणाघात केला आहे.

ठाणे: आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. हे सरकार काही महिन्यांचं काही दिवसांचं नाही तर हे सरकार काही तासांचेच आहे. आम्ही सत्तेत आल्यावर सगळ्याचं मोजमाप करु, असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघात केला आहे. एका व्यक्तीच्या स्वार्थापायी सरकार उलथवलं. आम्ही लवकरच सत्तेत येणार, ज्यांना जागा दाखवायची त्यांना जागा दाखवणार, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी ठाण्याच्या मोर्चात केला आहे.

ठाण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ हा मोर्चा ठाकरे गटाकडून काढण्यात आला होता. यावेळी सुषमा अंधारे तसेच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते. Aditya Thackeray criticised Eknath Shinde and devendra Fadnavis over Roshani Shinde beaten case was live in Thane pup

- Advertisement -

सरकार आलं की जेलभरु

आमचं सरकार आल्यानंतर गद्दार ग‌ॅंगचे जे आयपीएस, आयएएस आणि इतर अधिकारी आहेत. त्यांच्याविरोधात बदल्याच्या भावनेतून नाही तर लोकांसाठी आम्ही चौकशी करु आणि जेलभरु, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिला.

आज आपल्याला 17 अटी आलेल्या आहेत. मोर्चा काढयचा असेल तर अमूकच बोलू शकतात. टाका, आमच्या सगळ्यांवर केसेस टाका पुन्हा होऊन जाऊदे. पोलीस आयुक्तांच्या ऑफिससाठी आम्ही एक टाळं आणलेलं आहे. कारण जेव्हा मिधेंच्या गद्दार ग‌ॅंगच्या लोकांनी, टोळींनी जेव्हा शिंदे ताईंवर हल्ला केला. तेव्हा तक्रार घ्यायला तयार नव्हते. उद्धव ठाकरे चिडून पोलीस आयुक्तालयात गेले तर पोलीस आयुक्त पळून गेले होते, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.

- Advertisement -

आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना चॅलेंज

घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करायला आलो आहे. स्वत: शहरामध्ये, जो स्वत:चा बालेकिल्ला मानायचे, आता मानत नाहीत. कारण मी त्यांना सांगितलं की ठाण्यातूनही लढून जिंकून दाखवणार. ठाणेकर मला स्वीकारायला तयार आहेत का? असं म्हणत ठाण्यात लढून जिंकून दाखवू, असे चॅलेंज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -