घरलाईफस्टाईलरोज दही खाण्याचे 'हे' आहेत फायदे

रोज दही खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे

Subscribe

दह्याचे योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात सेवन केल्यास तुम्हाला भरपूर प्रमाणात आरोग्यदायी लाभ मिळतील. शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यापासून ते हृदयाचे आरोग्य जपण्यापर्यंत कित्येक औषधी गुणधर्मांचा दह्यामध्ये समावेश आहे. दह्याद्वारे शरीराला मोठ्या प्रमाणात पोषकतत्त्वांचा पुरवठा होतो. शरीरासह तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठीही दह्याचं सेवन करणं फायदेशीर ठरेल. जाणून घेऊया दह्याचे आरोग्यवर्धक फायदे. तसेच दह्याचे सेवन केल्यास कोण-कोणते फायदे शरीराला मिळतात.

9 Superfoods That Help Digestion

- Advertisement -

शरीराचे तापमान कमी होते

दक्षिण भारतात दही-भात जास्त प्रमाणात का खातात हे तुम्हाला माहीत आहे का? कारण तिथे वर्षभर उष्ण वातावरण असते. अशा वातावरणात दही-भात शरीराचे तापमान कमी करण्यास मदत करतो. गरम जेवणानंतर दही-भात खाल्ल्याने थंड वाटते.

प्रोटीन अधिक प्रमाणात मिळतात

दह्यात कॅल्शिअमप्रमाणे प्रोटीनचे प्रमाणात अधिक असते. दही एक चांगले अँटीऑक्सीडेंटही आहे. म्हणून दही खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात.

- Advertisement -

तणाव दूर होतो

दही तुमचा तणाव दूर करते. दह्यामधील असलेले प्रोबायोटिक बँक्टेरिया तुमचा तणाव दूर करण्यास मदत करते, असे एका अभ्यासातून समोर आले आहे.

वजन घटवण्यास मदत होते

दही-भात एकत्र खाल्ल्याने वजन घटवण्यास मदत होते. दही-भात एकत्र खाल्ल्याने तुम्हाला एक ते दोन महिन्यात फरक दिसेल. यामध्ये कॅलरी असतात त्यामुळे दही-भात तुम्ही बिनधास्तपणे खाऊ शकता.

पोटदुखी दूर होते

मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम भातामध्ये अधिक प्रमाणात आढळतात. त्यामुळे पोटाचे दुखणे दूर होते. दही-भात खाल्ल्याने मासिकपाळीच्या आधी होणारा त्रासही कमी होतो.

वजन नियंत्रणात राहते

ज्यांना आपले वजन नियंत्रणात ठेवायचे आहे किंवा काही इंच कमी करायचे आहे त्यांच्यासाठी दही हा एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये असलेले उच्च प्रथिन घटक तुम्हाला दीर्घ काळासाठी पोट भरून ठेवण्यास मदत करतात.

​रोगप्रतिकारक क्षमता वाढते

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारामध्ये दह्याचा समावेश करा. डॉक्टरांच्या माहितीनुसार दह्यामध्ये प्रोबायोटिक बॅक्टेरिया असतात, जे शरीरासाठी पोषक असतात. त्यामुळे दह्याच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

​हाडे होतील मजबूत

दह्यामध्ये असणाऱ्या कॅल्शियम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन डी आणि प्रोटीन या पोषकतत्त्वांमुळे हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. शिवाय, दह्यातील प्रोटीन शरीरातील पेशी दुरुस्त करण्यासह नवीन पेशी तयार करण्यासही मदत करतात.

​रक्तदाबाचा त्रास होतो कमी

रक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवण्यासाठी दह्याचे सेवन करणं लाभदायक ठरू शकतं. संशोधकांच्या माहितीनुसार, दह्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. दह्यामध्ये काही प्रोबायोटिक्स बॅक्टेरिया असतात. हे बॅक्टेरिया आरोग्यासाठी फायदेशीर असतात.


हेही वाचा : आठवड्यातून एकदा तरी खा कारले; आहेत जबरदस्त फायदे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -