Tuesday, April 30, 2024
घरमानिनीअल्पवयीन मुली टॅम्पॉन किंवा मेंस्ट्रुअल कपचा वापर करु शकतात का?

अल्पवयीन मुली टॅम्पॉन किंवा मेंस्ट्रुअल कपचा वापर करु शकतात का?

Subscribe

टॅम्पॉन अथवा मेंस्ट्रुअल कप हे सध्या मासिक पाळीदरम्यान बहुतांश तरुणी वापरतात. परंतु तरीही काही महिलांच्या मनात याबद्दलचे विविध प्रश्न असतात. खासकरुन अल्पवयीन मुलींबद्दल. जसे की, त्यांनी टॅम्पॉन अथवा मेंस्ट्रुअल कप वापरावा का? याच प्रश्नाचे उत्तर आपण आज जाणून घेणार आहोत.

तज्ञ असे मानतात की, याचा वापर मासिक पाळी सुरु झाल्यानंतर लगेच केला जाऊ शकतो. जर तुमची बहिण किंवा नातेवाईकांच्या मनात ते कोणत्या वयात वापरावे असा प्रश्न असेल तर त्याबद्दलही आपण पाहूयात. खरंतर २५ किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या महिलांना टॅम्पॉन किंवा मेंस्ट्रुअल कपचा वापर करणे सोप्पे असते. परंतु ज्या मुलींना नुकतीच मासिक पाळीची सुरुवात झाली आहे ते याचा वापर करण्यासाठी घाबरतात. त्यांना अशी भिती वाटत असते की, ते योनित लावल्यानंतर अडकू नये.

- Advertisement -

दरम्यान, टॅम्पॉन आणि मेंस्ट्रुअल कप संदर्भात काही तथ्य सुद्धा आहेत. त्यांना अशा गोष्टीची भिती वाटत राहते की, त्यांचे हाइमन ब्रेक होईल. तज्ञांनुसार ज्यावेळी मुलींमध्ये मासिक पाळीला सुरुवात होते तेव्हा त्या प्युबर्टी गेन करतात. त्यामुळे त्या मेंस्ट्रुअल कप किंवा टॅम्पॉनचा वापर करण्यास पूर्णपणे तया असतात. यामधील एकही तथ्य सत्य नाही.

- Advertisement -

वयाच्या ११ व्या वर्षापासून ही वापर करु शकतात
गाइनेकॉलॉजिस्ट असे सांगतात की, मुली कोणत्याही वात मेंस्ट्रुअल कपचा वापर करण्यास सुरुवात करु शकतात. येथे लक्ष द्यावे की, ते याचा वापर करण्यास तयार आहेत. काही वेळेस मुली टॅम्पॉनच्या दोऱ्यामुळे ही घाबरतात. सध्या वयाच्या ११ व्या वर्षी सुद्धा मुलींना मासिक पाळी येण्यास सुरुवात झाली आहे. त्या सुद्धा याचा वापर करत आहेत.

त्यामुळे टॅम्पॉन किंवा मेंस्ट्रुअल कप वापरण्यासंबंधित वयाची अट नाही. त्या सॅनिटरी पॅड, टॅम्पॉन किंवा मेंस्ट्रुअल कप यामधील कोणत्याही गोष्टीची निवड मासिक पाळीदरम्यान करु शकतात. हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय असेल. याच्या वापरापूर्वी ते कसे लावावे ते शिकणे फार महत्वाचे असते.

पहिल्यांदा टॅम्पॉन अथवा मेंस्ट्रुअल कपचा वापर करताना ते कसे लावावे हे शिकणे कठीण वाटू शकते. परंतु ही एक सामान्य प्रक्रिया आहे. एकदा का त्या ते कसे लावायचे आणि कसा वापर करायचा हे शिकल्या की काही समस्या उद्भवत नाही. यामुळे दुखत ही नाही. तुम्ही फिरण्यासाठई किंवा स्विमिंग करतेवेळी तुम्हाला ते लावले आहे की नाही हे सुद्धा कळत नाही.

टॅम्पॉन किंवा मेंस्ट्रुअल कपची निवड कशी कराल?
सध्या मार्केटमधअये विविध प्रकारचे टॅम्पॉन मिळतात. त्यामुळे ज्यांना नुकतीच मासिक पाळी सुरु झाली आहे ते लाइट फअलो असणारे पातळ टॅम्पॉन वापरु शकतात. कारण ते लहान असतात आणि योनित टाकण्यास सोप्पे होते. काही दिवसानंतर जर त्यांना आपला ब्लड फो कसा आहे हे कळू लागले तर त्यानुसार ते टॅम्पॉनच्या बदलेल्या आकारानुसार खरेदी करु शकतात.

या व्यतिरिक्त मेंस्ट्रुअल कप सुद्धा विविध आकाराचे येतात. त्यामध्ये अल्पवयीन ते बाळाला जन्म दिल्यानंतरच्या महिलेने कोणते वापरावे हे सुद्धा सांगितले जाते. याची माहिती तुम्हाला गाइनॅक किंवा ऑनलाईनवर ही मिळते.

 


हेही वाचा: सॅनिटरी पॅड…मेंस्ट्रुअल कप की टॅम्पॉन? मासिक पाळीदरम्यान बेस्ट पर्याय कोणता?

- Advertisment -

Manini