Monday, April 29, 2024
घरमानिनीसॅनिटरी पॅड...मेंस्ट्रुअल कप की टॅम्पॉन? मासिक पाळीदरम्यान बेस्ट पर्याय कोणता?

सॅनिटरी पॅड…मेंस्ट्रुअल कप की टॅम्पॉन? मासिक पाळीदरम्यान बेस्ट पर्याय कोणता?

Subscribe

बहुतांश महिला मासिक पाळीच्या वेळी हाइजिन प्रोडक्टसच्या रुपात सॅनिटरी पॅडचा वापर करतात. परंतु तुम्हाला माहितेय का सॅनिटरी पॅड प्रमाणेच मेंस्ट्रुअल कप आणि टॅम्पॉनचा सुद्धा मासिक पाळी दरम्यान वापर केला जातो. खरंतर टॅम्पॉन हे एक हाइजिन प्रोडक्ट आहे, ज्याच्या माध्यमातून मासिक पाळीदरम्यान शरिरातन निघणारे ब्लडला शोषून घेण्यासाठी वजाइनामध्ये फिट केले जाते. हे खुप मऊ असते. टॅम्पॉन हे कॉटन आणि रेयॉन पासून तयार केलेले असतात. हे पीरियड्समधल ब्लड फ्लो आणि अब्जॉर्बेंस कॅपिसिटीच्या हिशोबाने वेगवेगळ्या आकाराचे येतात. तर अन्य पीरियड हाइजिन प्रोडक्ट्स जसे की, पीरियड पँन्टी किंवा मेंस्ट्रुअल कपच्या तुलनेत काही फायदे आहेत.

टॅम्पॉनचे फायदे

- Advertisement -


-टॅम्पॉन सॅनिटरी पॅडच्या तुलनेत अधिक कंम्फर्टेबल असल्याचे मानले जाते. कारण ते थेट वजाइनलमध्ये टाकले जाते.
-टॅम्पॉन हे सॅनिटरी पॅड प्रमाणे आपल्या शरिराची हालचाल अधिक झाल्यास तर ते हलत नाहीत. या व्यतिरिक्त पॅड आपण ज्या ठिकाणी लावतो तेथून काही वेळानंतर सरकले जातात. परंतु टॅम्पॉनसोबत असे होत नाही.
-टॅम्पॉनची अब्जॉर्बेंस कॅपिसीटी ही उत्तम असते. खरंतर याचा वापर ८ तासांपर्यंत केला जाऊ शकतो. परंतु तुमचा ब्लड फ्लो कसा आहे यावर सुद्धा ते अवलंबून असते.

मेंस्ट्रुअल कप

- Advertisement -


मेंस्ट्रुअल कप एक प्रकारचे रियुजेबल प्रोडक्ट आहे. ते रबर किंवा सिलिकॉन पासून तयार करण्यात आलेला एक लहानसा, फ्लेक्सिबल असलेल्या कपाप्रमाणे असतो. मासिक पाळीवेळी तो ब्लड अब्जॉर्ब करण्यासाठी वजाइनमध्ये टाकला जातो. मेंस्ट्रुअल कप अन्य पीरिड्सच्या प्रोडक्टमध्ये अधिक बलड स्टोर करु शकतो. तुम्ही एक कप ८-१२ तासांपर्यंत घालून ठेवू शकता. परंतु जर तुमचा ब्लड फ्लो अधिक तर तो रिकामा करावा लागू शकतो.

मेंस्ट्रुअल कपचे फायदे
-मेंस्ट्रुअल कप हा एक रियुजेबल प्रोडक्ट आङे. त्यामुळे तुम्ही एकदाच पैसे यासाठी देऊन काही वर्षांसाठी तो वापरु शकता.
-मेंस्ट्रुअल कप अगदी सुरक्षित आहे. कारण मासिक पाळीवेळी रक्त शोषून घेण्याऐवजी ते स्टोर करते. तर टॅम्पॉनच्या वापरामुळे बॅक्टेरियल इंन्फेक्शन टॉक्सिस शॉक सिंड्रोम होण्याचा धोका असतो. मात् तो मेंस्ट्रुअल कपमध्ये नसतो.

सॅनिटरी पॅड


सॅनिटरी पॅड कॉटन अथवा अन्य अब्जॉर्बेंट मटेरियल पासून तयार केलेले असतात. मेंस्ट्रुअल कप तुम्ही पुन्हा वापरु शकता. मात्र पॅड आणि टॅम्पॉनचा केवळ एकाच वेळी एकदाच वापर केला जाऊ शकतो. पॅड आणि टॅम्पॉन हे डिस्पोजेबल असतात आणि ते वापरल्यानंतर तुम्हाला टाकून द्यावे लागतात. पॅड मासिक पाळीदरम्यानचे ब्लड शोषून घेते. त्याचसोबत ते दिवसभरात ३-४ वेळा बदलण्याची गरज असते.

 


हेही वाचा: PCOS- रेग्युलर पिरियड म्हणजे ऑल इज वेल असं नाही?

- Advertisment -

Manini