Sunday, April 28, 2024
घरमानिनीHealthमेंस्ट्रुअल कप खरेदी करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

मेंस्ट्रुअल कप खरेदी करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

Subscribe

अलीकडल्या काळात मेंस्ट्रुअल कपचा वापर प्रत्येक वर्गातील महिला करत आहेत. याचा वापर करणे अगदी सोप्पे आहेच पण पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून सुद्धा हे अनुकूल आहे. कधीकधी मेंस्ट्रुअल कपची साइज योग्य कशी निवडावी याचा प्रश्न पडतो. अशातच आम्ही तुम्हाला मेंस्ट्रुअल कपची साइज तुम्ही कशी निवडावी याच बद्दल सांगणार आहोत.

ज्या प्रमाणे आपण रेग्युलर, एक्सएल, एक्सएक्सएल सॅनिटरी पॅडची निवड करता त्याच प्रमाणे लाइट किंवा हेवी फ्लो च्या आधारावर मेंस्ट्रुअल कपची निवड केली जाते. दरम्यान, मेंस्ट्रुअल कपच्या साइजची निवड ही वय आणि गर्भाव्यस्था सारख्या काही गोष्टींवर अवलंबून असू शकते.

- Advertisement -

दरम्यान, सर्विकल लेंथच्या कारणास्तव महिला विविध आकाराचे मेंस्ट्रुअल कपची निवड करतात. जर तुम्ही असा विचार करत असाल की, ते तुमच्या योनित अडकले जाईल तर तसे काहीही नाही.

- Advertisement -

तुमच्यानुसार कशी निवडाल मेंस्ट्रुअल कपची योग्य साइज?
-वजाइनल चाइल्ड बर्थ
जर तुमची नॉर्मल डिलिवरी झाली असेल तर तुम्ही मोठ्या आकाराचा मेंस्ट्रुअल कपची निवड करु शकता.

-सर्जरीच्या माध्यमातून डिलिवरी
जर तुमची सी-सेक्शन सर्जरी झाली असेल तर तुम्ही मध्यम किंवा लहान आकाराचा मेंस्ट्रुअल कप निवडू शकता.

-मुलं झालं नसेल
जर असे असेल तर तुम्ही मध्यम किंवा लहान आकाराच्या मेंस्ट्रुअल कपचा निवड करु शकता.

-टीएनर्जसाठी
अल्पवयीन मुलींसाठी, ज्यांनी पेनिट्रेटिव्ह सेक्स केले नसेल त्यांनी लहान आकाराचा मेंस्ट्रुअल कप वापरावा. परंतु यावेळी तुमचा ब्लड फ्लो कसा आहे हे सुद्धा पहा. सिलिकॉन मेंस्ट्रुल कप तीन वेगवेगळ्या आकारात उपलब्ध आहेत. महिलेच्या वयानुसार आणि फ्लो च्या आधारावर त्याचा निवड करु शकता.

-अधिक फ्लो असणाऱ्या महिलांसाठी
३५ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या महिलांसाठी किंवा अधिक ब्लड फ्लो असणाऱ्या महिलांनी मोठ्या आकाराचा मेंस्ट्रुअल कप खरेदी करावा. तर मध्यम आकाराचा मेंस्ट्रुअल कपचा वापर २५-३५ वयोगटातील महिलांनी करावा. मात्र त्यांचा फ्लो सुद्धा नॉर्मल असावा. पहिल्यांदा वापर करणाऱ्या किंवा टीएनएज मुलींनी लहान आकाराचा मेंस्ट्रुअल कप घ्यावा.

 


हेही वाचा: सॅनिटरी पॅड…मेंस्ट्रुअल कप की टॅम्पॉन? मासिक पाळीदरम्यान बेस्ट पर्याय कोणता?

- Advertisment -

Manini