Monday, May 6, 2024
घरमानिनीDiaryDiary- पहीलं प्रेम, सुंदर आभास

Diary- पहीलं प्रेम, सुंदर आभास

Subscribe

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !....

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !….

कविवर्य मंगेश पाडगावकरांची ही कविता म्हणजे जाज्वल्य प्रेमाचं प्रतिकचं. कारण या कवितेच्या ओळीतच प्रेमाचं आयुष्यातील महत्व मोजक्याच शब्दात सांगण्यात आलंय. त्यातही पहीलं प्रेम हे अविस्नरणीयच असतं. रोहीतने मीनूला कॉलेजमध्ये पहील्यांदाच बघितलं आणि तो तिच्या प्रेमात पडला.

- Advertisement -

गोल गोबऱ्या गालाची, गव्हाळ रंगाची बॉबकट असलेली बडबडी आणि मनमोकळ्या स्वभावाची मीनू रोहीतचं पहीलं प्रेम. त्याने तिच्याशी लगेच मैत्रीही केली. रोहीतही हँडसम आणि सभ्य असल्याने मीनूनेही त्याची मैत्रीची ऑफर लगेच स्विकारली. ती त्याला इतरांप्रमाणेच चांगल्या मित्राच्या दृष्टीकोनातून बघायची. पण रोहीतच्या मनात मात्र वेगळंच सुरू होतं. याची तिला पुसटशीही कल्पना नव्हती. माझं तुझ्यावर प्रेम आहे हे सांगायला रोहीत कचरत होता.

यामुळे त्याचे मित्र त्याच्यावर  वैतागायचे. मीनूबरोबर मैत्री करण्यासाठी मुलं पैजा लावायची. कारण मीनू जेवढी क्यूट होती तेवढीच ती तिखट होती. मैत्रीसाठी कायपण करणारी पण मुलांशी हातच राखूनच बोलायची. टारगटपणा तिला आवडत नव्हता. मर्यादांच तिला उत्तम भान होतं. यामुळे तिच्यासाऱखी मैत्रीण हवी असे बऱ्याच मुलांना वाटायचे. रोहीतने तिचे हेच गुण हेरले. हळूहळू रोहीत तिच्या प्रेमात असल्याचं सगळ्याच ग्रुपला समजलं.

- Advertisement -

त्यानंतर रोहीत त्याच्या मित्रांबरोबर कँटीनमध्ये गप्पा मारत असताना मीनू तेथे आली. ती रागाने लालबुंद झाली होती. रोहीतच्या आपल्या बद्दलच्या भावना कळाल्यावर मीनू संतापली होती . तिने सगळ्यांसमोर रोहीतला वाटेल ते सुनावले आणि पाय आपटतच ती गेली. मीनूचे मोकळ्या वागण्यामुळे खरंतर रोहीतलाही कुठतरी असं वाटायला लागलं होतं की मीनूलाही तो आवडतोय. यामुळे रोहीत मनातून सुखावला होता. तो तिला खुश करण्यासाठी सतत प्रयत्न करायचा.

पण मीनूने त्याला भानावर आणलं. मी तुला इतरांप्रमाणेच एक चांगला मित्र मानते आणि तू मात्र टपोरी सारखा …असं बोलत मीनू रोहीतवर रागावली. मीनूचे शब्द रोहीतच्या काळजाला भिडले. त्याच मन इतक दुखावलं की तो तिथून तडक बाहेर पडला. मित्रही ओशाळले. काहीजणांनी रोहीतला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण रोहीतने बाईकला किक मारली आणि तो गेला.

त्यानंतर चार पाच दिवस मीनू कॉलेजला आलीच नाही. रोहीत मात्र कॉलेजला येत होता. मीनूच्या नकाराने तो निराश होता. पण त्याने मनाची समजूत काढली. मीनूला वेळ द्यायला हवा. आज ना उद्या ती होकार देणार असा त्याला विश्वास होता. यामुळे त्याने मीनूशी बोलायचं ठरवलं होतं. तिला विचार करायला हवा तेवढा वेळ द्यायचा  त्याने ठरवलं.पण पाच दिवस उलटूनही मीनू आली नाही. ती कोणाचेही कॉल रिसीव्ह करत नव्हती. रोहीतनेही तिला कॉल केले, मेसेज केले. पण मीनू कोणालाही रिप्लाय देत नव्हती. यामुळे ग्रुपमधील काही जणांनी मीनूच्या घरी जायची तयारी दर्शवली. ते तिच्या घरी गेले.

मीनूने तिला बरं वाटतं नसल्याचं सगळ्यांना सांगितलं. तसेच रोहीतचा गैरसमज आपण स्वत: दूर करणार असल्याचं ती म्हणाली. त्यामुळे सगळे मित्रही टेन्शनमध्ये आले. रोहीत किती हर्ट होईल याची त्यांना काळजी वाटू लागली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मीनूने थेट रोहीतला कँटीनमध्ये न बोलावता कॉफी हबमध्ये बोलावलं. रोहीतला कळत नव्हत काय करायचं. पण तरीही तो तिला भेटायला गेला. मीनूने दोघांसाठी कॉफी ऑडर्र केली. त्यानंतर तिने थेट रोहीतला सांगितल की तू खूप चांगला आहेस. मी तुला कधीच त्या वेगळ्या नजरेने बघितलंच नाही. तुला मी आवडते ही चांगली गोष्ट आहे. पण त्यापुढे तू माझा विचार करू नकोस.कारण माझ्या आयुष्यात कोणीतरी दुसरं आहे. मीनूचे हे वाक्य ऐकून रोहीतला धक्काच बसला. कारण मीनू कुठे एंगेज आहे हे कोणालाच माहित नव्हतं. त्यामुळेच रोहीतला विश्वास होता की आज ना उद्या ती त्याच्या प्रेमाचा स्विकार करेल. पण आता विषयच संपला होता. रोहीत तिथून उठला त्याने मीनूला सॉरी म्हटलं आणि डबडबलेल्या डोळ्यांनी तो कॉलेजच्या दिशेने निघाला. त्याच पहीलं प्रेम दुसऱ्याचंच होतं. हे त्याला सहनचं होत नव्हतं.

 

- Advertisment -

Manini