घरलाईफस्टाईलTime Management म्हणजे यशाची गुरुकिल्ली

Time Management म्हणजे यशाची गुरुकिल्ली

Subscribe

प्रत्येकाच्या आयुष्यात वेळाला खूप महत्त्व आहे. तुम्ही वेळेचा जसा वापर कराल, तसेच परिणाम तुम्हाला मिळतील. लहानपणापासून वेळेचे महत्त्व तुम्हाला तुमच्या वडिलधाऱ्यांनी सांगितले असेल. आयुष्यात पुढे जाण्यासाठी वेळेचा योग्य वापर करणे खूप गरजेचे आहे. तुम्ही विद्यार्थी अवस्थेत असल्यापासूनच तुम्ही वेळचे नियोजन करणे खूप गरजेचे असते.

कोणतीही व्यक्ती जो दिवसाचे 24 तास वेळेचे नियोजनानुसार कामे करत, तो नक्कीच आपल्या आयुष्यात यशाची शिखरे गाठतो. तुम्ही विद्यार्थी असो किंवा नोकरी करणारे असा, तुम्हाला वेळेचे नियोजन करणे ही एक सिक्ल असले पाहिजे. तुम्ही वेळेचे नियोजन केले तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तुम्ही वेळेचे योग्य नियोजन केले नसेल, तर यश तुमच्यापासून लांब राहते. मग आज आपण जाणून घेऊ या की, वेळेचे नियोजनसाठी या टिप्स फोलो करा.

- Advertisement -

वेळेचे नियोजन करण्याच्या ‘या’ आहेत टिप्स 

वेळेचे नियोजन करा – सर्वप्रथम दिवसभरात तुम्ही जे काही काम करणार आहात, त्याचे नियोजन तयार करा. यानंतर Specific वेळ ठेवा की, टाइम टेबल प्रामाणे तुम्ही सर्व गोष्टी फॉलो करा

- Advertisement -

महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य द्या – तुम्हाला कोणते काम सर्वप्रथम करायचे आहे आणि कोणते काम तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, ते आधी ठरवा. त्यानुसार दिवसभराची कामे करा.

चालढकल करू नका – कोणतेही काम चालढकल करू नका किंवा दुसऱ्या दिवसासाठी ठेवू नका. तुम्हाला जेवढे शक्य असेल, तेवढ्या लवकरात लवकर काम करा, कारण उद्या कधीच येत नाही.

 

प्रत्येक गोष्ट डायरीत नोंद करा – दिवसभरात तुम्हाला जी गोष्ट अत्यंत महत्त्वाचे काम असेल, ते तुम्ही डायरीमध्ये लिहून ठेवा. डायरीमध्ये लिहिलेली कोणतीही गोष्टी मिस करू नका. डायरीत नोंद केलेल्या सर्व गोष्टी वेळच्या वेळी करत जा.

स्मार्ट टूल्सचा वापर करा – आजकाल मार्केटमध्ये अनेक टूल्स आले आहेत. तुम्ही वेळेचे नियोजन करण्यासाठी हेल्प घेऊ शकता. उदा. Digital Calendars, Time-Tracking Apps आणि रिमाइंटर Appचा वापर करा.

ब्रेकपण गजेचा – तुम्ही वेळेचे नियोजन करत असताना रेगुलर ब्रेक घेणेही तितकाच गरजेचा आहे. यामुळे तुम्ही रेफ्रेश होऊन पुन्हा जोमाने काम करू शकाल

हेल्थकडे लक्ष द्यावेळेच्या नियोजनाबरोबरच तुम्ही तुमच्या हेल्थकडे देखील लक्ष दिले पाहिजे. तुमच्या शरीराला तंदुरुत ठेवण्यासाठी जॉगिंगला हा दिनक्रमाचा एक भाग बनवा आणि यामुळे तुम्ही तणाव मुक्त राहता.


हेही वाचा – वर्क परफॉर्मेन्स उत्तम ठेवण्यासाठी ‘या’ स्मार्ट strategies वापरा

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -