Monday, April 29, 2024
घरमानिनीHealthजुन्या बूट आणि चपलामुळे पायाला भोवरे

जुन्या बूट आणि चपलामुळे पायाला भोवरे

Subscribe

जुन्या चप्पल बुट आपण वापरतोच. पण त्याच्या क्वालिटीकडे मात्र दुर्लक्ष करतो. नॉन लेदर रेक्सीन, प्लास्टिकच्या चपल आपण घालतो. कारण या व्यतिरिक्त दुसरा ऑप्शन आपल्याकडे नसतो. भारतात विक्री करण्यात येणाऱ्या ३८ टक्के फुटवियर चीन मधून तयार होऊन येतात. पण त्यांची क्वालिटी ही खराब असते. याच सोबत कधीकधी आपल्या पायाला बसत नसतील तरीही थोडं अधिक घट्ट चपल घेतो कारण त्या सुंदर दिसतात. याचा परिणाम असा होतो की, पायाची बोटं, तळवे, टाचा नंतर फार दुखतात. याच समस्येला फुट कॉर्न असे म्हटले जाते.

ज्या लोकांना बुट फिट बसत नाहीत त्यांना भोवरी येण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. यामुळे काही फार मोठे नुकसान होत नाही. पण फार दुखते. तसेच चालताना-फिरताना सुद्धा त्रास होतो. उन्हाळ्याच्या दिवसात भोवरी येण्याची समस्या उद्भवू शकते. याला समर कॉर्न असे ही म्हटले जाते. सर्वसामान्यपणे उन्हाळ्यात लोकांच्या अंगठ्याच्या स्किनवर फोड आल्यासारखे दिसते.

- Advertisement -

भोवरी आल्यानंतर ती स्वत:हून काढण्याचा अजिबात प्रयत्न करु नये. त्यासाठी डॉक्टरांना प्रथम भेटा. भोवरी वाढली असेल तर तुम्हाला ती काढावीच लागते.

- Advertisement -

भोवरी येण्यापासून बचाव करण्यासाठी काय कराल?
-अधिक घट्ट किंवा लूज चपल घालू नका
-हाय हिल्स सतत घालण्यापासून दूर रहा
-बुटांच्या आतमधील भाग सॉफ्ट आहे की नाही ते पहा
-मोजे घातल्याशिवाय शूज घालू नका
-खुप वेळ सायकल चालवू नका


हेही वाचा- दिवसातून किती वेळा हात धुवावे

- Advertisment -

Manini